बेस्टच्या मदतीला धावणा-या एसटीकडून नाशिककरांना अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:02 PM2020-10-15T23:02:51+5:302020-10-16T02:04:33+5:30
नाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियू अनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांना देणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे महापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असली तरी तुर्तास राज्य परिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरू ठेवावी अशी मागणी भाजपाचे गटनेते जगदीश पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे मुंबईत बेस्टच्या मदतीला धावणारे परिवहन महामंडळ नाशिकवर करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
नाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियू अनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांना देणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे महापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असली तरी तुर्तास राज्य परिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरू ठेवावी अशी मागणी भाजपाचे गटनेते जगदीश पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे मुंबईत बेस्टच्या मदतीला धावणारे परिवहन महामंडळ नाशिकवर करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारची दळणवळणाची साधने ठप्प झाली आहेत. त्यात शहर बस वाहतूक बंद करण्यात आली होती आता ग्रामीण भागात महामंडळाने बस सेवा सुरू केली मात्र, शहरात ही सेवा सुरू करण्यास टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून लोकमतने याबाबत महामंडळाची हट्टी कारभारामुळे अडचण येत असल्याचे सातत्याने मांडले आहे.
त्या अनुषंगाने भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी आयुक्त कैलास जाधव यांना पत्र दिले आहे.
विशेष म्हणजे महापालिकेने ही सेवा चालवावी ही तत्कालीन सत्तारूढ भाजपाची भूमिका असतानही सध्या निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेत पाटील यांनीच आता आयुक्तांना पत्र दिले. त्यात नाशिक महापालिकेनेच ही सेवा अशा कठीण परिस्थितीत चालवावी यासाठी महामंडळावर दबाव कोण आणत
आहे, याचा शोध घेण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.
शहर बस वाहतूक चालवण्याची जबाबदारी महामंडळाने झटकून ही सेवा महापालिकेच्या माथी मारण्यात आली.त्यानंतर देखील महापालिकेने तोट्यातील सेवा चालविण्यासाठी तयारी केली आहे. एकुण चारशे बस साठी निविदा काढून त्या अंतिम केल्याने आहेत. बस स्थानके तसेच डेपो, इंटीग्रेटेड ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम्स, वाहक भरती अशाप्रकारची कार्यवाही महापालिकेकडून सुरू आहे. मार्च पासून ही सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाने चंग बांधला होता. मात्र, कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले आणि आता तर महापालिकेची
आर्थिक स्थिती बिकट होत असताना महामंडळ मात्र अंग काढून घेत आहे त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांना पत्र देताना महापालिकेच्या आर्थिक स्थितीची जाणिव करून दिली आहे. करोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. बससेवा सुरु करायचे झाल्यास अद्याप टर्मिनस व बसथांबे नाहीत, तकीट वसुलीसाठी मक्तेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे शहर बससेवा सुरु करू नये अशी मागणी त्यांनी केली आहेत जो पर्यंत महापालिकेची आर्थिक स्थिती पूर्व पदावर येत नाही तो पर्यंत महापालिकेने बस सेवा सुरू करू नये असेही त्यांनी नमूद केले आहे.
बेस्टच्या मदतीला धावणा-या एसटीकडून नाशिककरांना अन्याय
भाजप गटनेत्यांचे पत्र: तूर्तास महामंडळाची बस सेवाच सुरू ठेवण्याची मागणी
नाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियू
अनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांना
देणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे
महापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असली तरी तुर्तास राज्य
परिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरू ठेवावी अशी मागणी भाजपाचे गटनेते
जगदीश पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे मुंबईत बेस्टच्या मदतीला
धावणारे परिवहन महामंडळ नाशिकवर करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला
आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारची दळणवळणाची साधने
ठप्प झाली आहेत. त्यात शहर बस वाहतूक बंद करण्यात आली होती आता ग्रामीण
भागात महामंडळाने बस सेवा सुरू केली मात्र, शहरात ही सेवा सुरू करण्यास
टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून लोकमतने याबाबत
महामंडळाची हट्टी कारभारामुळे अडचण येत असल्याचे सातत्याने मांडले आहे.
त्या अनुषंगाने भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी आयुक्त कैलास जाधव यांना
पत्र दिले आहे. विशेष म्हणजे महापालिकेने ही सेवा चालवावी ही तत्कालीन
सत्तारूढ भाजपाची भूमिका असतानही सध्या निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा
घेत पाटील यांनीच आता आयुक्तांना पत्र दिले. त्यात नाशिक महापालिकेनेच
ही सेवा अशा कठीण परिस्थितीत चालवावी यासाठी महामंडळावर दबाव कोण आणत
आहे, याचा शोध घेण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.
शहर बस वाहतूक चालवण्याची जबाबदारी महामंडळाने झटकून ही सेवा
महापालिकेच्या माथी मारण्यात आली.त्यानंतर देखील महापालिकेने तोट्यातील
सेवा चालविण्यासाठी तयारी केली आहे. एकुण चारशे बस साठी निविदा काढून
त्या अंतिम केल्याने आहेत. बस स्थानके तसेच डेपो, इंटीग्रेटेड ट्रॅफीक
मॅनेजमेंट सिस्टीम्स, वाहक भरती अशाप्रकारची कार्यवाही महापालिकेकडून
सुरू आहे. मार्च पासून ही सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाने चंग बांधला
होता. मात्र, कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले आणि आता तर महापालिकेची
आर्थिक स्थिती बिकट होत असताना महामंडळ मात्र अंग काढून घेत आहे त्या
पार्श्वभूमीवर आयुक्तांना पत्र देताना महापालिकेच्या आर्थिक स्थितीची
जाणिव करून दिली आहे. करोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली
आहे. बससेवा सुरु करायचे झाल्यास अद्याप टर्मिनस व बसथांबे नाहीत, तकीट
वसुलीसाठी मक्तेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे शहर बससेवा
सुरु करू नये अशी मागणी त्यांनी केली आहेत जो पर्यंत महापालिकेची आर्थिक
स्थिती पूर्व पदावर येत नाही तो पर्यंत महापालिकेने बस सेवा सुरू करू नये
असेही त्यांनी नमूद केले आहे.