आदिवासी तालुक्यांवर अन्याय : स्थायी समितीत जोरदार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 02:00 AM2019-12-18T02:00:16+5:302019-12-18T02:00:42+5:30

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांतील रस्ते बांधकामासाठी सन २०१७-१८ मध्ये प्राप्त झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शासनाकडे परत गेल्याची बाब स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आली आहे. सदरचा निधी का परत गेला, त्याला जबाबदार कोण याचा खुलासा प्रशासनातील अधिकारी करू शकले नाहीत. त्यामुळे सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले.

Injustice on tribal talukas: vigorous debate in standing committee | आदिवासी तालुक्यांवर अन्याय : स्थायी समितीत जोरदार चर्चा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करताना यतिन कदम, अपर्णा खोसकर, नयना गावित, डॉ़ आत्माराम कुंभार्डे, भास्कर गावित आदी़ व्यासपीठावर जि़प़ अध्यक्ष शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस़ भुवनेश्वरी़

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ४० कोटींचा निधी परत

नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांतील रस्ते बांधकामासाठी सन २०१७-१८ मध्ये प्राप्त झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शासनाकडे परत गेल्याची बाब स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आली आहे. सदरचा निधी का परत गेला, त्याला जबाबदार कोण याचा खुलासा प्रशासनातील अधिकारी करू शकले नाहीत. त्यामुळे सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले.
स्थायी समितीच्या सभेत भास्कर गावित यांनी सदरचा प्रश्न उपस्थित केला. सन २०१७-१८ या वर्षासाठी आदिवासी उपाययोजनांमधून नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील रस्त्यांचे बळकटीकरण, नवीन रस्त्यांची बांधणी व दुरुस्तीसाठी ४० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. त्यासाठी कोणत्या रस्त्यांची कामे केली जाणार याचे अंदाजपत्रक तयार करून कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती. तथापि, बांधकाम खात्याच्या अधिकाºयांनी कार्यारंभ आदेश काढले नाहीत, परिणामी मार्च-२०१९ मध्ये हा निधी पुन्हा शासनाकडे परत करावा लागला. भास्कर गावित यांनी सभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर निधी परत गेल्याचा खुलासा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गांगुर्डे यांनी केला. त्यावर सदस्यांनी संताप व्यक्त केला. एकीकडे ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याची ओरड केली जाते, दुसरीकडे मात्र निधी मिळूनही अधिकाºयांच्या काम न करण्याच्या वृत्तीमुळे पैसे परत जात असल्याची टीका करण्यात आली. या साºया बाबीस जबाबदार कोण व त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न गावित, डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी विचारला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शीतल सांगळे यांनीही कार्यकारी अभियंता गांगुर्डे यांना कामांची प्रशासकीय मान्यता का देण्यात आली नाही, अशी विचारणा करून धारेवर धरले. त्यावर गांगुर्डे यांनी निवडणूक आचारसंहितेचे थातूरमातूर कारण देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सदरच्या निधीची पुन्हा शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले़
चांदवडला बहुद्देशीय इमारत
समाजकल्याण खात्याच्या निधीतून चांदवड येथे दिव्यांग व्यक्तींसाठी बहुद्देशीय इमारत उभारण्यास मंगळवारच्या सभेत मंजुरी देण्यात आली. या इमारतीत दिव्यांग व्यक्तींसाठी सभागृह, ट्रेनिंग सेंटर, बचत गटांना गाळे आदींची सोय असणार आहे. अपंग कल्याण निधीतून प्रारंभी ८९ लाख रुपये या इमारतीसाठी मंजूर करण्यात आले होते. प्रशासकीय कारणास्तव प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे समाजकल्याण खात्याचा काही निधी अन्यत्र वर्ग करण्यात आला. प्रारंभी ४२ लाखांच्या निधी खर्चाला मंजुरी देण्यात आली व पुढच्या आर्थिक वर्षात उर्वरित रकमेची तरतूद करण्याचे ठरविण्यात आले.

Web Title: Injustice on tribal talukas: vigorous debate in standing committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.