धर्मक्रियेत अपूर्व आनंदाची अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:08 AM2019-02-09T00:08:42+5:302019-02-09T00:32:03+5:30
पर्वतिथीच्या दिवशी भगवंताच्या दर्शनास आल्याचे कर्तव्य स्वर्गातील देवसुद्धा करतात तर आपल्याला करायलाच हवे. आपल्या हृदयात जेव्हा धर्माप्रती आदर-बहुमान निर्माण होईल तेव्हा अशा धर्मक्रियेत अपूर्व आनंदाची अनुभूती होईल, असे प्रतिपादन जैनाचार्य प्रवचनप्रदीप पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.
नाशिकरोड : पर्वतिथीच्या दिवशी भगवंताच्या दर्शनास आल्याचे कर्तव्य स्वर्गातील देवसुद्धा करतात तर आपल्याला करायलाच हवे. आपल्या हृदयात जेव्हा धर्माप्रती आदर-बहुमान निर्माण होईल तेव्हा अशा धर्मक्रियेत अपूर्व आनंदाची अनुभूती होईल, असे प्रतिपादन जैनाचार्य प्रवचनप्रदीप पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.
लॅमरोड बालगृहरोड येथील कालापूर्णम् धाममध्ये उपधानतपाच्या प्रवचनात बोलताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी आजच्या युगात हिल स्टेशनवर फिरायला जायला लागलीच तयार होतो. मात्र मंदिरात देवाकडे जायला कंटाळा करतो. त्याचाच अर्थ असा की जितका संसार मनात ठसला आहे तितका धर्माचे प्रेम हृदयात जागृत झालेले नाही. शिलभद्रच्या कथेचा पुढील भाग सांगताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, संगमच्या कथेत त्याच्या मनात साधू महाराजांसाठी कसा आदर होता हे आपण बघितले. आज माझ्या घरी खीरसारखे परमान्न हजर आहे. त्यात साधू-संत आले आहेत ही माझ्यासाठी सुवर्णसंधी आहे. म्हणून स्वत:चा विचार न करता संगमने सर्व खीर साधू-संतांच्या पात्रामध्ये समर्पित केली. साधू महाराज बस झालं-बस झाल असे सांगत राहिले तरीदेखील संगमच्या मनाचे उत्कृष्ट भाव पाहून त्यांनीही संगमला नाकारता आले नाही. संगमच्या चेहऱ्यावरची आनंदरेखा अविस्मरणीय होती, असे जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.
आज पर्वतिथीचा दिवस असल्याने उपधान तपाच्या आराधकांना दैनंदिन कार्यापेक्षा चैत्य परिपारीचा महिमा सांगण्यात आली. चैत्य परिवारी म्हणजे आजूबाजूच्या मंदिरात देवदर्शनासाठी जाणे होय. देवळाली परिसरात असलेल्या मंदिरांमध्ये बुधवारी सकाळी
आचार्यश्री तसेच साधू-साध्वी, आराधक दर्शनासाठी गेले होते.