जळगाव बुद्रुकच्या २६ ग्रामस्थांची निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 11:35 PM2021-11-23T23:35:51+5:302021-11-23T23:35:51+5:30

नांदगाव : तालुक्यातील जळगाव बुद्रुक शिवारात बारा वर्षांपूर्वी गाजलेल्या बिबट्या प्रकरणी तहसीलदारासह पोलीस व वन विभागातील कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणातील सव्वीस ग्रामस्थांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

Innocent release of 26 villagers of Jalgaon Budruk | जळगाव बुद्रुकच्या २६ ग्रामस्थांची निर्दोष मुक्तता

जळगाव बुद्रुकच्या २६ ग्रामस्थांची निर्दोष मुक्तता

googlenewsNext
ठळक मुद्देनांदगाव : बारा वर्षांपूर्वी बिबट्या प्रकरणावरून तहसीलदार, कर्मचाऱ्यांवरील हल्ला प्रकरण

नांदगाव : तालुक्यातील जळगाव बुद्रुक शिवारात बारा वर्षांपूर्वी गाजलेल्या बिबट्या प्रकरणी तहसीलदारासह पोलीस व वन विभागातील कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणातील सव्वीस ग्रामस्थांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा जण जखमी झाल्याने व बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा येत नसल्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी तहसीलदारासह पोलिसांवर हल्ला चढविला होता. हे प्रकरण त्या काळात चांगलेच गाजले होते. तेव्हाचे तहसीलदार सुनील गाढे यांनी याबाबतीत जळगाव बुद्रुक येथील बाळू मोतीराम आव्हाड यांच्यासह एकूण सव्वीस गावकऱ्यांविरोधात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

तेव्हाचे पोलीस निरीक्षक प्रकाश मेढे यांनी घटनेचा तपास करून या सर्व सव्वीस ग्रामस्थांवर आरोपपत्र ठेवण्यात आले होते, तहसीलदार सुनील गाढे, सहायक पोलीस निरीक्षक परदेशी यांच्यासह घटनास्थळावर वृत्ताकंन करण्यासाठी आलेल्या सात पत्रकारांसह एकूण चौदा साक्षीदारांची मालेगावच्या जिल्हा व सत्र न्यायालयात साक्षींची तपासणी करण्यात आली होती.
जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. जळगाव बुद्रुक प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणाने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

Web Title: Innocent release of 26 villagers of Jalgaon Budruk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.