गणिताच्या आवडीसाठी ‘गणितमित्र’चा अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:02 AM2019-12-22T01:02:56+5:302019-12-22T01:03:15+5:30

शालेय शिक्षणात गणिताला महत्त्वाचे स्थान आहे. शालेयस्तरावर दहावीपर्यंत गणित हा अनिवार्य विषय आहे. या शालेय जीवनात गणिताची गोडी विकसित झाली तर गणित हा आयुष्यभर आवडीचा विषय बनतो. याकरिता विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी गणित विषयाची गोडी वाढविण्यासाठी नाशिकच्या दोन गणिततज्ज्ञ शिक्षकांनी व्हॉट््सअ‍ॅप ग्रुप सुरू केला असून, राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थी या माध्यमातून गणितामध्ये रूची घेऊ लागले आहेत.

 Innovative 'Mathematics' initiative for the interest of mathematics | गणिताच्या आवडीसाठी ‘गणितमित्र’चा अभिनव उपक्रम

गणिताच्या आवडीसाठी ‘गणितमित्र’चा अभिनव उपक्रम

googlenewsNext

नाशिक : शालेय शिक्षणात गणिताला महत्त्वाचे स्थान आहे. शालेयस्तरावर दहावीपर्यंत गणित हा अनिवार्य विषय आहे. या शालेय जीवनात गणिताची गोडी विकसित झाली तर गणित हा आयुष्यभर आवडीचा विषय बनतो. याकरिता विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी गणित विषयाची गोडी वाढविण्यासाठी नाशिकच्या दोन गणिततज्ज्ञ शिक्षकांनी व्हॉट््सअ‍ॅप ग्रुप सुरू केला असून, राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थी या माध्यमातून गणितामध्ये रूची घेऊ लागले आहेत.
फेब्रुवारी २०१९ पासून ‘गणितमित्र नाशिक’ या संकल्पनेची सुरुवात गणिततज्ज्ञ शिक्षक वाल्मीक चव्हाण आणि वैभव शिंदे या गणितमित्रांनी सुरुवात केली आहे. या ‘गणितमित्र नाशिक’ मंचाचे एका छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे. नाशिक येथे गणित विषय सहायक म्हणून कार्यरत या शिक्षकांनी संपूर्ण महाराष्ट्रात गणिताची सर्वांमध्ये ओढ निर्माण करण्यासाठी ही चळवळ सुरू केली आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात सामाजिक माध्यमांचा परिणामकारक वापर करताना गणिताविषयी आपल्या शंका, समाधान, अडचणी सोडविण्यासाठी ‘व्हॉट््सअ‍ॅपवर’ गणितमित्र संपर्क साधू शकतात. गणित म्हणजे काय? आपल्या पाल्याला, विद्यार्थ्याला, स्वत: आपल्याला गणिताची अभिरु ची कशी वाढवावी? याकरिता गणितमित्र मंचावरून प्रत्येक गणितमित्राला नियमतिपणे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करून आतापर्यंत जवळपास ४५०० शिक्षक, १३०० पालक-विद्यार्थी या सेवेचा लाभ घेत आहेत. यात योगेश महाजन, सुनील पेलमहाले, वर्षा चौधरी आदी गणितमित्र शिक्षकांनी राबविलेले उपक्र म, लेख, कृती हे सुद्धा वाचकांपर्यंत पाठविण्यात येत आहेत. गणितमित्रांचे वाढत्या लोकप्रियतेमुळे नवीन जोडणाऱ्या गणितमित्रांना सुद्धा मागील सर्व माहिती उपलब्ध व्हावी.
याकरिता एप्रिल-२०१९ पासून ‘६६६.ँल्ल्र३े्र३१ं.ूङ्म.्रल्ल ही वेबसाइट सुरु करण्यात आली. अत्यंत अल्पावधीत या वेबसाइटला आतापर्यंत १३ लाखांपेक्षा अधिक वेळा गणितमित्रांनी भेट दिली आहे. भारताबाहेर सुद्धा गणितमित्र जोडले गेले आहे.
आॅस्ट्रेलिया येथील काही पालक या मंचावर सक्रि य आहेत. याचा नियमित वापर करणाºया शिक्षक-पालक यांचा सकारात्मक प्रतिसाद नियमतिपणे मिळत आहे. आणखी असाच प्रतिसाद वाढू शकतो.
असे आहे कार्य, असे आहे उद्दिष्ट
स्पर्धा परीक्षेतील विचार करणारे प्रश्न, सहज सोपे सुलभ गणित, अमूर्त समजले जाणारे गणित मूर्तस्वरूपात बघण्याचा दृष्टिकोन विकसित करणारे गणित, गणित साहित्याचे उपयोजन, आपल्या गणितीय शंका व समस्या यांचे निराकरण, गणित विषयक विविध लेख व उपक्र म, एक प्रश्न आपल्यासाठी, दर आठवड्याला पाच प्रश्नांची प्रश्नमंजूषा तसेच प्रत्येक मूल व व्यक्ती गणित शिकू शकते हा
दृष्टिकोन विकसित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
गणिताची भीती दूर करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने गणित अध्ययन अध्यापन केल्यास गणिताची भीती दूर होऊन शकते. गणिताची भीती नव्हे तर गोडी निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी मुळात गणिताची आवड निर्माण होणे अपेक्षित आहे. अशी आवड निर्माण होणे व ज्यांना आवड आहे त्यांच्यात ती अधिक वृद्धिगंत होण्यासाठी हा उप्रकम महत्त्वपूर्ण आहे.
वाल्मीक चव्हाण, गणितमित्र शिक्षक
गणित विषयाची अभिरूची निर्माण करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान, कौशल्य संपादित करण्यासाठी तसेच गणितातील समस्या, शंका सोडविण्यासाठी गणितमित्र मंचची स्थापना केलेली आहे. गणिताची आवड असलेले आणि नसलेले या प्रवाहात सहभागी होत असून, गणिताची चळवळ उभी राहत आहे.
- वैभव शिंदे, गणितमित्र शिक्षक

Web Title:  Innovative 'Mathematics' initiative for the interest of mathematics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.