मुलांच्या पायांचे ठसे घेऊन शाळेत अभिनव स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:56 AM2019-06-18T00:56:12+5:302019-06-18T00:56:39+5:30

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये सोमवारी शाळा प्रवेशोत्सव सोहळा अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.

 Innovative reception at the school with the footprints of children's feet | मुलांच्या पायांचे ठसे घेऊन शाळेत अभिनव स्वागत

मुलांच्या पायांचे ठसे घेऊन शाळेत अभिनव स्वागत

Next

नाशिक : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये सोमवारी शाळा प्रवेशोत्सव सोहळा अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.
अंगणवाडींमध्येदेखील नव्यानेच दाखल झालेल्या मुलांच्या पायांचे ठसे घेण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात शाळा व अंगणवाडी प्रवेशोस्तव साजरा करण्यात आला असून, ग्रामीण भागातील शाळांकडे पालकांचा कल वाढावा व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी व्यापक प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.
शाळा व अंगणवाडी प्रवेशोत्सवानिमित्त विविध वेशभूषा केलेली मुले, लेजीम पथक, बैलगाडीसारख्या वाहनातून मिरवणूक यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर यांनी नाशिक तालुक्यातील सावरगाव, गंगाव्हरे, मुंगसरे येथील शाळा व अंगणवाडींना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात ११ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येत असून, विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, पालक-शिक्षक समिती बैठक, मोफत पाठ्यपुस्तके वितरण नियोजन, शाळाबाह्य मुलांच्या भेटी, गाव दवंडी, मशाल फेरी आदी उपक्रमांचे आयोजन करून जिल्ह्यातील ग्रामीण भागात वातावरण निर्मिती करण्यात आली.

Web Title:  Innovative reception at the school with the footprints of children's feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.