तहसीलदारांकडून बाधित रुग्णांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:14 AM2021-04-11T04:14:01+5:302021-04-11T04:14:01+5:30
पेठ - नगरपंचायत क्षेत्रात बाधित रुग्ण असलेल्या प्रतिबंधित क्षेत्राला तहसीलदार संदीप भोसले यांनी तालुकास्तरीय प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे ...
पेठ - नगरपंचायत क्षेत्रात बाधित रुग्ण असलेल्या प्रतिबंधित क्षेत्राला तहसीलदार संदीप भोसले यांनी तालुकास्तरीय प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे समवेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून बाधित रुग्णांचे मनोबल वाढवतांना सूचनाही दिल्या.
पेठ शहरातील बाधित रुग्ण असलेल्या प्रतिबंधित क्षेत्राची शुक्रवारी भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार, चंद्रकांत भोये, नागेश भालेराव आदींसह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी पेठ शहरातील विविध प्रतिबंधित क्षेत्रांना भेटी देऊन रुग्णांची विचारपूस करतांना नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन केले. ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांनी पूर्ण कालावधी संपेपर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.
-------------
पेठ नगरपंचायत प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करतांना तहसीलदार संदीप भोसले, नम्रता जगताप, डॉ. योगेश मोरे, लक्ष्मीकांत कहार आदी. (१० पेठ २)
===Photopath===
100421\10nsk_18_10042021_13.jpg
===Caption===
१० पेठ २