बोगस क्रीडा प्रमाणपत्रांबाबत २५८ प्रकरणांमध्ये चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:11 AM2020-12-23T04:11:39+5:302020-12-23T04:11:39+5:30
नाशिक : राज्यभरातील विविध क्रीडा संघटनांनी खेळाडूंना बोगस प्रमाणपत्र दिल्याच्या २५८ तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या असून, त्या सर्व प्रकरणांची ...
नाशिक : राज्यभरातील विविध क्रीडा संघटनांनी खेळाडूंना बोगस प्रमाणपत्र दिल्याच्या २५८ तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या असून, त्या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकारांना सांगितले.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकला आलेल्या असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात बऱ्याच ठिकाणी बोगस प्रमाणपत्रांवर नोकऱ्या मिळवण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना तटकरे यांनी बोगस प्रमाणपत्रांमुळे कष्ट घेऊन खेळणाऱ्या खऱ्या खेळाडूंवर अन्याय होत असल्याचे सांगितले. त्यामुळे या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश क्रीडामंत्री केदार यांच्यासह मीदेखील दिले आहेत. तसेच नोंदणीकृत क्रीडा असोसिएशनला नियमावली आखून देण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी नमूद केले.