चौकशी मिलची नाही तर 'कोहिनूर हिऱ्याची' करताय, मनसेनं फ्लेक्स झळकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 02:38 PM2019-08-19T14:38:01+5:302019-08-19T15:25:03+5:30

शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

The inquiry is not about miles but 'Kohinoor diamond', MNS flex about raj thackarey issue of ED notice | चौकशी मिलची नाही तर 'कोहिनूर हिऱ्याची' करताय, मनसेनं फ्लेक्स झळकावले

चौकशी मिलची नाही तर 'कोहिनूर हिऱ्याची' करताय, मनसेनं फ्लेक्स झळकावले

googlenewsNext

नाशिक - लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर चौफेर टीका करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठविली आहे. कोहिनूर मिलव्यवहारप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून येत्या 22 ऑगस्टला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर, मनसैनिकांनी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. तर, विरोधी पक्षही राज ठाकरेंच्या बाजुने उभा राहिला आहे.  

शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना लोकसभा निवडणुकीत टार्गेट केल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यानंतर, आता नाशिकमधील मनसेचे कार्यकर्ते शाम गोहाड यांनी डिजिटल फलक झळकावत सरकारवर टीका केली आहे. 

शहरातील नाशिक रोड येथे ही होर्डींग्ज झळकली असून 'चौकशी कोहिनूर मीलची नाही, तर मराठी माणसाच्या ह्रदयातील कोहिनूर हिऱ्याची करताय'. इतक्या मोठ्या संपत्तीचे ते एकमेव वारसदार आहेत. म्हणून अशा ईडीच्या नोटीस येऊ लागल्या आहेत. साहेब, तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही तुमच्या सोबत आहोत! असा मजकूर या डिजिटल फलकावर लिहिण्यात आला आहे. दरम्यान, राज ठाकरेंवरील कारवाईवरुन विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि धनंजय मुंडे यांनीही सरकारला लक्ष्य केलं आहे. 
 

Web Title: The inquiry is not about miles but 'Kohinoor diamond', MNS flex about raj thackarey issue of ED notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.