लखमापूर घरकुलप्रकरणाच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 02:24 PM2019-11-06T14:24:13+5:302019-11-06T14:24:31+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील घरकुल अनियमितता असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्र ारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली असून संबंधितांना चौकशी करु न निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील घरकुल अनियमितता असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्र ारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली असून संबंधितांना चौकशी करु न निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लखमापुरच्या एकवीस ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी व विभागीय आयुक्त राजाराम माने यांचेकडे घरकुल प्रकरणी अनियमतिता झाल्याची लेखी तक्र ार केली होती. त्या तक्र ारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त अरविंद मोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकारी समिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे पत्रात नमुद करण्यात आले आहे. तसेच प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा यांना कार्यवाहीस्तव आदेशाची प्रत पाठविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशी करु न तक्र ारदारांना उत्तर द्यावे तसेच तक्र ारीत तथ्य आढळल्यास संबधितांविरोधात शासन नियमानुसार कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे म्हटले आहे. दरम्यान या प्रशासकीय कार्यप्रणालीची एक प्रत तक्र ारदारांना देण्यात आली आहे. दरम्यान विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले असुन माहितीच्या अधिकारात उघड झालेले घरकुल प्रकरण प्रकाशझोतात आले आहे.