ग्रामसेवक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात चौकशी सुरू, मात्र ग्रामसेवक ‘आदर्श’
By Admin | Published: December 13, 2014 01:57 AM2014-12-13T01:57:39+5:302014-12-13T01:59:45+5:30
ग्रामसेवक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात चौकशी सुरू, मात्र ग्रामसेवक ‘आदर्श’
नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची उदाहरणे असतानाच गुरुवारी वितरीत करण्यात आलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारालाही वादाची झालर प्राप्त झाली आहे. पेठ तालुक्यातून देण्यात आलेला आदर्श ग्रामसेवक पुरस्कार पेठ ग्रामपंचायती अंतर्गत सुरू असलेल्या एका चौकशी प्रकरणातील ग्रामसेवकाला दिला गेल्याची चर्चा आहे. याबाबत पेठ ग्रामपंचायत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच १३ व्या वित्त आयोगातील संशयास्पद कामगिरीमुळे वेतनवाढ रोखण्याचा ‘बोनस’ प्राप्त झालेल्या ग्रामसेवकाची ३९ (१) नुसार चौकशी सुरू असतानाच जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने संबंधित ग्रामसेवकाला आदर्श पुरस्काराच्या यादीत समाविष्ट केल्यामुळे तर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील वर्षी १३व्या वित्त आयोगात भूमिगत गटार योजनेच्या कामात व निधीत अफरातफर केल्याप्रकरणी पेठ ग्रामपंचायतीच्या एका सदस्याने विभागीय आयुक्तांकडे पेठचे सरपंच उत्तम महाले व ग्रामसेवक मोतीराम चौधरी यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानुसार या दोघांविरोधात ३९ (१) नुसार कारवाई प्रस्तावित करण्याची कार्यवाही सुरू होती. याप्रकरणाचीच दखल घेत दोन महिन्यापूर्वीच संबंधित ग्रामसेवकाची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने घेतल्याचे समजते. असे असूनही जिल्'ात आदर्श ग्रामसेवक पुरस्काराच्या यादीत पेठ तालुक्यातून मोतीराम चौधरी यांचे नाव ग्रामपंचायत विभागाने नेमके कशाच्या आधारे निवडले,