भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 07:16 PM2020-10-13T19:16:45+5:302020-10-13T19:22:16+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यात भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव व किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गापुढे संकट ओढवले आहे. याबाबत शासनाने दखल घ्यावी व रोगामुळे नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, पंचनामे करण्यात यावेत यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ सरसावले असून मंगळवारी(दि.१३) इगतपुरी तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन देत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.

Insect infestation on rice crop | भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव

तहसीलदार यांना निवेदन देतांना पांडुरंग शिंदे, संपत काळे,जनार्दन माळी, संदीप गुळवे, गोरख बोडके, निवृत्ती जाधव, पांडुरंग वारु ंगसे, बाळासाहेब वालझाडे, राजाभाऊ नाठे, दिनकर उघडे, भगीरथ मराडे आदी.

Next
ठळक मुद्देइगतपुरी : सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र : निवेदन देऊन वेधले लक्ष

घोटी : इगतपुरी तालुक्यात भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव व किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गापुढे संकट ओढवले आहे. याबाबत शासनाने दखल घ्यावी व रोगामुळे नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, पंचनामे करण्यात यावेत यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ सरसावले असून मंगळवारी(दि.१३) इगतपुरी तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन देत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.
इगतपुरी तालुक्यातील भातशेती धोक्यात आली असुन भात पिकांवर करपा, तुडतुडा, पांढराटाका आदी रोगांनी भात पिके उध्वस्त झाली आहे. त्यामुळे त्वरित कृषी विभागाने पीक पाहणी दौरा व पंचनामे करण्यात यावे या संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती संपत काळे. माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, संदीप गुळवे, गोरख बोडके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, मधुकर कोकणे, माजी उपसभापती पांडुरंग वारु ंगसे, बाळासाहेब वालझाडे, माजी तालुकाध्यक्ष राजाभाऊ नाठे, दिनकर उघडे, भगीरथ मराडे, शिवा काळे, ज्ञानेश्वर कडू, भोलेनाथ चव्हाण, कैलास घारे, वसंत भोसले, राजेंद्र भटाटे, पंढरी लंगडे, लता जाधव, नामदेव शिंद,े गुलाब वाजे, पंढरी जमधडे, उत्तम शिंदे, भिका पानसरे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Insect infestation on rice crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.