विकृत विधान करणारी कीड ठेचली पाहिजे : रूपाली चाकणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 01:34 AM2022-05-18T01:34:56+5:302022-05-18T01:35:29+5:30
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राजकारणातील प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी देशाचे नेतृत्व केलेले आहे. गुरूतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याविषयी विकृत पोस्ट करणारी कीड वेळीच ठेचून काढली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.
नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राजकारणातील प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी देशाचे नेतृत्व केलेले आहे. गुरूतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याविषयी विकृत पोस्ट करणारी कीड वेळीच ठेचून काढली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली. सोमवारी जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी आलेल्या चाकणकर यांनी शासकीय विश्रामगृहात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. केतकी चितळे हिने केलेले विधान हे महाराष्ट्रात तेढ निर्माण करणारे असून, अत्यंत हीन पातळीवरची ही मानसिकता आहे. चितळेने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर राज्यभरातून अनेक तक्रारी राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेल्या आहेत. चितळेच्या सोशल पोस्टचे समर्थन करणारी विकृत प्रवृत्ती असल्याचेही चाकणकर यांनी सांगितले.
राज्यातील वातावरण बिघडविण्याचा हा प्रकार असल्याने अशा प्रवृत्तींवर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. राज्यातील पोलीस आपले काम करीत असून, पोलिसांना कुणी सल्ले देण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, महिलांवरील अत्याचारासंदर्भात तक्रार करण्यासाठी १५५२०९ हा टोल क्रमांक असून, ‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ असा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील महिलांसाठी ११२ तर शहरी भागातील महिलांसाठी १०९१ असा टोल फ्री क्रमांक असल्याचेही चाकणकर यांनी सांगितले.