कामचुकार बीएलओंवर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:11 AM2018-07-10T01:11:14+5:302018-07-10T01:11:31+5:30
: निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम करण्यास नकार देणाऱ्या बीएलओंवर अगोदर निलंबनाची नोटीस द्या त्यानंतरही त्यांनी कामकाज करण्यास नकार दिला तर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी निवडणूक अधिका-यांना दिले.
नाशिक : निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम करण्यास नकार देणाऱ्या बीएलओंवर अगोदर निलंबनाची नोटीस द्या त्यानंतरही त्यांनी कामकाज करण्यास नकार दिला तर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी निवडणूक अधिकाºयांना दिले. त्याचबरोबर काम करून घेण्यास अपयशी ठरणाºया अधिकाºयांची वेतनवाढ रोखण्याची तंबीही त्यांनी दिली. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले असून, त्यात मतदाराचे रंगीत छायाचित्र गोळा करणे, दुबार मतदाराचे नाव वगळणे, प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन नमुना १ ते ८ मधील माहिती गोळा करणे आदी कामांचा समावेश असून, जून महिन्यातच सदरची कामे पूर्ण करणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, देवळाली या सहा मतदारसंघांचे काम खूपच कमी झाल्याने सोमवारी जिल्हाधिकाºयांनी या मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत अधिकाºयांना जाब विचारण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच, काम न करणाºया बीएलओंना अगोदर निलंबनाच्या नोटिसा बजावण्यात याव्यात, त्याला जर प्रतिसाद दिला नाही तर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १०५० कलम ३२ अन्ये आणि लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ मधील व भारतीय दंड संहिता कलम १८७ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी बीएलओ म्हणून नेमलेले नाशिक महापालिकेचे शिक्षक व अंगणवाडी सेविका काम करीत नसल्याची तक्रार करण्यात आल्यावर जिल्हाधिकाºयांनी बैठकीतूनच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना फोन करून कर्मचारी उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्यावर तातडीने महापालिकेचे उपायुक्त फडोळ, बच्छाव व प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.
म्हणून जिल्हाधिकारी संतापले
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनकुमार यांनी दोनच दिवसांपूर्वी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील सर्वच जिल्हाधिकाºयांशी संवाद साधला असता, त्यावेळी घेण्यात आलेल्या कामाच्या आढाव्यात नाशिक जिल्ह्याचे काम ६९ टक्केच झाल्याने अश्विनकुमार यांनी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन यांना चांगलेच फैलावर घेतले. नाशिकचे काम समाधानकारक नसल्याचा शेराही त्यांनी मारला. नाशिकप्रमाणे ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद, रायगडच्या जिल्हाधिकाºयांनाही यावेळी अश्विनकुमार यांनी जाब विचारला. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाधिकाºयांनी सोमवारी बैठक घेऊन स्वत:चा राग मतदार नोंदणी अधिकाºयांवर काढला.