दाेन डबल तर एक सिंगल साठी आग्रही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:15 AM2021-01-21T04:15:00+5:302021-01-21T04:15:00+5:30
महापालिकेच्या निवडणूका तोडांवर असून त्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे. १५ दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत चार सदस्यीय पध्दतीऐवजी ...
महापालिकेच्या निवडणूका तोडांवर असून त्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे. १५ दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत चार सदस्यीय पध्दतीऐवजी एक सदस्यीय पध्दतीची मागणी करण्यात आली हेाती. तर दुसरीकडे शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत मात्र दाेन सदस्यीय प्रभागांची मागणी करण्यात आली. तसे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना घालण्यात आले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात शहर काँग्रेसची भूमिका विचारली हेाती. बुधवारी थोरात हे एका विवाह सोहोळ्यासाठी अचानक नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर नगरसेवक आणि पदाधिकारी अशी प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी दोन सदस्यांचा प्रभाग करावा, अशी मागणी करतानाच काँग्रेस पक्ष स्वबळावर १२२ जागांवर उमेदवार देणार असल्याचे देखील ठरवण्यात आल्याचे शहराध्यक्ष शरद आहेर व कॉग्रेस गटनेते शाहु खैरे यांनी सांगितले. बैठकीस माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील,शैलेश कुटे यांच्यासह अन्य वत्सला खैरे, राहूल दिवे, समीण कांबळे, रईस शेख, सिराजोद्दीन कोकणी, अण्णा पाटील, आशा तडवी, विजय राऊत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होेते.
इन्फेा..
भाजप- राष्ट्रवादीच्या विरोधात तक्रारी
२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने मित्र पक्ष म्हणून आघाडी केली आणि प्रत्यक्षात कॉग्रेस पक्षाच्या विरोधात उमेदवार उभे केले अशी तक्रार शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली. तर महापालिकेत भूसंपादन प्राधान्याच्या नावाखाली मोठा घोटाळा झाल्याचा आरोप गटनेते शाहु खैरे यांनी केला. महापालिकेतील चुकीच्या कामांची चौकशी करण्याची मागणीही काँग्रेसने केली.
इन्फो...
महापालिका निवडणुकीमुळे सतत संपर्कात राहू तसेच काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे नाशिकमध्ये जनता दरबार भरवण्याची ग्वाही बाळासाहेब थोरात यांनी दिली. कॉंग्रेस नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याकडे जनतेच्या असलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक बोलवण्याचे आश्वासन दिले.
....
छायाचित्र २० कॉग्रेस