नांदुरी घाटात वाहनांची तपासणी
By admin | Published: June 3, 2017 12:46 AM2017-06-03T00:46:46+5:302017-06-03T00:46:57+5:30
कळवण : किसान क्र ांती मोर्चा व कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी, शेतकरी नेत्यांनी पुकारलेल्या संपाला तालुक्यातून प्रतिसाद मिळत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : किसान क्र ांती मोर्चा व कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी, शेतकरी नेत्यांनी
दि. १ जूनपासून पुकारलेल्या संपाला कळवण तालुक्यातून प्रतिसाद मिळत असून, शहराकडे व गुजरातकडे भाजीपाला व दूध जाऊ नये यासाठी कळवणच्या नेत्यांनी नांदुरी घाटात तळ ठोकून वाहनांची तपासणी करण्याची मोहीम होती घेतली
आहे.
सकाळपासून कळवण बाजार समिती, भाजी बाजार, दूध संकलन केंदे्र बंद ठेऊन शेतकरी संपात सहभागी झाले आहेत. कळवण तालुकाध्यक्ष अॅग्रो डिलर असोसिएशनने शेतकरी संपाला पाठिंबा दिला असल्याची माहिती शेतकरी सेवा केंद्राचे संचालक राजेंद्र मालपुरे यांनी दिली.
तालुक्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यांवर ओतून व भाजीपाला रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला आहे.
या आंदोलनात पोपट पवार, दिलीप देशमुख, राजेंद्र आहेर, रत्नाकर गांगुर्डे, शिवाजी रौंदळ, संदीप
पगार, रमेश वाघ आदींसह तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले आहेत.