देवळा तालुक्यातील गावांची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 06:32 PM2019-07-17T18:32:35+5:302019-07-17T18:32:44+5:30

जलशक्ती अभियान : विविध गावांचा केला दौरा

 Inspect the villages of Deola taluka by the central squad | देवळा तालुक्यातील गावांची केंद्रीय पथकाकडून पाहणी

देवळा तालुक्यातील गावांची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Next
ठळक मुद्देपाण्याचा थेंब न थेंब अडविण्याचा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा उद्देश

खर्डे : केंद्रीय जलशक्ती अभियानाच्या कमिटीने बुधवारी (दि.१७) रामेश्वर ,भावडे व पिंपंळगाव (वा ) येथील ग्रामपंचायतींना भेटी देऊन या गावातील पाझर तलाव ,वनतळे , वृक्ष लागवड आदी कामांची पाहणी केली .
केंद्र शासनाने स्थापन केलेल्या जलशक्ती मंत्रालयाने जिल्ह्यातील देवळा तालुक्याची निवड केली आहे. कमिटीच्या सदस्यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देण्यावर भर दिला असून , या कमिटीचा बुधवारी झालेला तिसरा दौरा होता. कमिटीने कापशी , खर्डे ,शेरी ,मटाने तसेच रामेश्वर ,भावडे व पिंपळगांव (वा ) येथील ग्रामपंचायतीना भेटी देऊन पाणी नियोजना संदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती करून घेतली . पाण्याचा थेंब न थेंब अडविण्याचा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा उद्देश असून , नाशिक जिल्ह्यातून निफाड ,सिन्नर व देवळा तालुक्याची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. पाणी आडवा पाणी जिरवा आदींसह सरकारने राबविलेल्या सिंचन योजनांची माहिती केंद्रीय पथकाने घेतली . पथकाच्या अचानक दौºयामुळे आधिकारी ,कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी तहसिलदार दत्तात्रेय शेजूळ , जि.प. स्थानिक स्तरच्या श्रीमती पाटील, कृषी विस्तार अधिकारी प्रशांत पवार आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी ,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते .

Web Title:  Inspect the villages of Deola taluka by the central squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक