फडणवीस यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 12:57 AM2021-05-01T00:57:28+5:302021-05-01T00:57:54+5:30
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नाशिकला जिल्हा शासकीय रुग्णालय, बिटको रुग्णालयाला भेट देऊन तेथे उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी बिटको रुग्णालयात काही रुग्णांच्या नातेवाइकांनी आरोग्य सुविधांबाबत तक्रारीही केल्या.
नाशिक : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नाशिकला जिल्हा शासकीय रुग्णालय, बिटको रुग्णालयाला भेट देऊन तेथे उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी बिटको रुग्णालयात काही रुग्णांच्या नातेवाइकांनी आरोग्य सुविधांबाबत तक्रारीही केल्या.
नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रेमडेसिविर, ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी दुपारी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशी उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यानंतर ते बिटको रुग्णालयात रवाना झाले. रुग्णालयातील सीटी स्कॅन व एमआरआय मशीन, ऑक्सिजन प्लांटला भेट दिली. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार भारती पवार, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, दिलीप बोरसे, महापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, गटनेते जगदीश पाटील आदी उपस्थित होते.