महावितरणकडून नुकसानीची पाहणी
By admin | Published: June 30, 2017 12:08 AM2017-06-30T00:08:09+5:302017-06-30T00:09:27+5:30
नागरिकांच्या घरामधील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून सिडको : खाक झाल्या असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : येथील अश्विननगरमध्ये अचानक वाढलेल्या विजेच्या दाबामुळे परिसरातील वीसहून अधिक नागरिकांच्या घरामधील एसी, पंखे, इर्न्व्हटर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी प्रभागाचे नगरसेवक किरण गामणे यादेखील उपस्थित होत्या.
अश्विननगर भागात गेल्या शनिवारी सकाळच्या सुमारास अचानक विजेचा प्रवाह वाढल्याने वीसहून अधिक रहिवाशांच्या घरातील विजेची उपकरणे जळून खाक झाली. तर एका घरातील वातानुकूलित यंत्राचा स्फोट झाल्याची घटना घडली असून, सुदैवाने यात मोठी दुर्घटना घडली नाही. गौरीशंकर गोपीराम अग्रवाल, राधेय मालपाणी, प्रशांत गोयल, राहुल मालपाणी, उपेंद्र काळे, अरविंद करकरे आदींसह वीसहून अधिक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. यात गौरीशंकर अग्रवाल यांच्या घरातील पाण्याची मोटार, मोबाइल चार्जर, इलेक्ट्रॉनिक्स गिझर, तर राधेय मालपाणी यांची लिफ्ट, तसेच मोटार जळून खाक झाली. गुरुवारी सकाळी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता ए. बी. पवार यांनी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन ग्राहकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक किरण गामणे उपस्थित होत्या. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांचे काय-काय नुकसान झाले याबाबतची यादी तयार केली असून, अहवाल तयार केला आहे.