अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:15 AM2021-03-23T04:15:34+5:302021-03-23T04:15:34+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर व परिसरात रविवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर व परिसरात रविवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी विभाग, ग्रामसेवक व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.
रविवारी दुपारी दापूर, दोडी, खंबाळे, दत्तनगर, शिवाजीनगर, गोंदे आदी भागांत अवकाळी पावसाने झोडपून काढले. गारपिटीमुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांची मोठी हानी झाली. वादळामुळे काही भागात पिके जमीनदोस्त झाली. प्रामुख्याने कांदा व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिन्नर पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ भाबड, दापूरचे सरपंच रमेश आव्हाड, गोंदेचे सरपंच अनिल तांबे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सोनवणे, कृषी सहायक वनिता शिंदे, ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र भणगीर आदींनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. रब्बी हंगामातील गहू, हरबरा, उन्हाळ बाजरी आदी पिके शेतकरी काढणीच्या तयारीत असताना, अवकाळीचा फटका त्यांना बसला आहे. दापूर परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा पिकांची लागवड केली जाते. वादळी पावसाने व गारांनी कांद्याची मोठी हानी झाली आहे. याप्रसंगी लहानू सोनवणे, सुरेश सोनवणे, भागवत तांबे, शरद जायभावे, दिलीप जायभावे, संतोष पवार, पिंटू साळवे, रमेश सोनवणे आदीसह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
--------------
नुकसानग्रस्तांना मदत द्यावी
सिन्नर तालुक्यातील दापूर व परिसरातील गावांना बेमोसमी पाऊस व गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. याबाबत कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू केले आहे. काही भागात गारपिटीने फळबागा व कांद्याचे नुकसान झाल्याने शासनाने त्यांना भरपाई द्यावी.
- जगन्नाथ भाबड, पंचायत समिती सदस्य.
सिन्नर तालुक्यातील दापूर व गोंदे परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. त्याप्रसंगी माजी उपसभापती जगन्नाथ भाबड, रमेश आव्हाड, अनिल तांबे, दत्तात्रय सोनवणे, वनिता शिंदे, मच्छिंद्र भणगीर आदी. (२२ सिन्नर ३)
फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील दापूर व गोंदे परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. त्याप्रसंगी माजी उपसभापती जगन्नाथ भाबड, रमेश आव्हाड, अनिल तांबे, दत्तात्रय सोनवणे, वनिता शिंदे, मच्छिंद्र भणगीर आदी. (२२ सिन्नर ३)
===Photopath===
220321\22nsk_10_22032021_13.jpg
===Caption===
२२ सिन्नर ३