रस्ता रुंदीकरणासाठी अधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:16 AM2019-01-29T00:16:18+5:302019-01-29T00:16:39+5:30
शहराच्या प्रवेशद्वारावरील रस्ता सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्यासाठी भगूर मार्केट व परिसरातील दुकानदार, टपरीधारकांना जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी या रस्त्याची अधिकाºयांनी पाहणी केली.
भगूर : शहराच्या प्रवेशद्वारावरील रस्ता सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्यासाठी भगूर मार्केट व परिसरातील दुकानदार, टपरीधारकांना जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी या रस्त्याची अधिकाºयांनी पाहणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून भगूरचे जुने रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर नागरिकांना भगूरला दळणवळणासाठी रेल्वेमोरी खालील रस्त्याचा वापर करीत होते. परंतु याठिकाणी नेहमीच दुर्गंधीयुक्त पाणी साचत असल्याने चिखलातून ये-जा करावी लागत होती. या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी भगूर पालिका प्रशासन व छावणी परिषदेकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु हा रस्ता रेल्वेच्या अखत्यारित असल्याने त्यासाठी पाठपुरावा करावा लागला.
अखेर शासनाने रस्त्याच्या कामास मंजुरी दिली. लवकरच सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार असून, त्यापार्श्वभुमीवर सोमवारी सकाळी मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, नगरअभियंता रमेश कांगणे, नगरसेवक मोहनराव करंजकर, भाऊसाहेब गायकवाड, संजय शिंदे, रमेश राठोड यांच्यासह रेल्वेचे अधिकारी युसुफ सय्यद व वीज कंपनीचे वरिष्ठ अभियंता सुजित नाशिककर यांनी रस्त्याची पाहणी केली.