भरवीर खुर्दच्या शाळा इमारतीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:00+5:302021-06-28T04:11:00+5:30
भरवीर खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत जीर्ण झाल्याने पावसाळ्यात गैरसोय व्हायची. या प्रश्नाकडे शिक्षकांसह ग्रामस्थांनी दीड ...
भरवीर खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत जीर्ण झाल्याने पावसाळ्यात गैरसोय व्हायची. या प्रश्नाकडे शिक्षकांसह ग्रामस्थांनी दीड वर्षापूर्वी सभापती जोशी यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार जोशी यांनी एचएएलच्या माध्यमातून एक कोटी २५ लाखांचा निधी मिळवून दिला. जवळपास दीड एकर शालेय मैदानात साकार होणाऱ्या या इमारतीच्या कामाची माहिती दिली. याप्रसंगी टाकेद येथील धावपटू ज्येष्ठ नागरिक आबाजी बारे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, भूषण डामसे, तानाजी शिंगाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण टोचे, देवराम रोंगटे, शिक्षक पांडुरंग आंबेकर, शिक्षिका वैशाली वालझाडे, कुंदा फणसे, निर्मला दिघे आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैशाली वालझाडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन शिक्षक पांडुरंग आंबेकर यांनी केले.