ग्रामस्वच्छता अभियान समितीकडून बोराळे गावाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 07:40 PM2019-05-14T19:40:32+5:302019-05-14T19:41:19+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील बोराळे येथे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत चांदवड तालुकास्तरीय समितीने भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील बोराळे येथे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत चांदवड तालुकास्तरीय समितीने भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली.
ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत चांदवड तालुकास्तरीय मुल्यमापन समितीने गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) सपकाळे आदिंसह टिम बोराळे गावात सोमवारी (दि.१३) दाखल होऊन आरो फिल्टर पाणी संच, अंगणवाडी, घंटागाडी, सांडपाणी व्यवस्थापन, भूमिगत गटार, सार्वजनिक शौचालय, ग्रामपंचायत कार्यालय, वैयक्तिक शौचालय व त्याचा वापर आदी विकासकामांची पाहणी केली.
यावेळी नांदगावचे विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) व्ही. के. ढवळे, एस. के. पाटणकर, बोराळेचे उपसरपंच राजेंद्र पवार, ग्रामसेवक राजेंद्र थोरात, आमोदेचे ग्रामसेवक मिलिंद सोनवणे, पी. एन. पाटील आदिंसह बोराळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.