देखणेंच्या भारुडांतून प्रबोधन
By admin | Published: January 4, 2015 12:58 AM2015-01-04T00:58:40+5:302015-01-04T00:59:07+5:30
अगगग गं विंचू चावला ़़़़ मिरजकर स्मृती समारोह : देखणेंच्या भारुडांतून प्रबोधन
नाशिक : अगगग गं विंचू चावला, दार उघड बये आता दार उघड, सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहील तुला, ऐसा वासुदेव बोलतो बोल, शकुन सांगाया आले यमाई माझे नाव अशा एकनाथांच्या जोरदार भारुडांचे सादरीकरण करत रामचंद्र देखणे यांनी नाशिककरांचे प्रबोधन केले़ परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे प्रमिला रामकृष्ण मिरजकर चॅरिटेबल प्रतिष्ठानच्या वतीने प्रमिलाबाई व रामकृष्ण मिरजकर यांच्या स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे़ या समारोहात आज संतसाहित्य व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ़ रामचंद्र देखणे यांच्या बहुरूपी भजनी भारुडाचा कार्यक्रम झाला़ डॉ़ देखणे, माजी प्राचार्य रा़ श़ गोरे, संजय मिरजकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन स्मृती समारोहाचे उद्घाटन झाले़ रामचंद्र देखणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रारंभी दिंडी काढून सर्व वातावरण विठ्ठलमय करून टाकले. टाळ-मृदंगाच्या तालात, हातात भगव्या पताका, चोपदार, भालदार अशा भावपूर्ण वातावरणात प्रेक्षकांमधून दिंडी व्यासपीठावर गेली़ तर या ठिकाणी वारकऱ्यांचे पावली नृत्य सादर करताना फुगडी सादर केली़ देखणे यांनी दिंडी व वारीचे महत्त्व पटवून देतानाच जनाबार्इंच्या ओव्या सादर केल्या़ यांनतर वासुदेव हे भारूड सादर केले़ कडक लक्ष्मीचे भारूड सादर करताना त्यांनी केलेल्या वेशभूषेचे सर्वांचे लक्ष वेधले़ तर या भारुडातच आयोजकांना कोरड्याचे फटकेही त्यांनी दिले़ या पाठोपाठ त्यांनी जोगवा हे भारूड सादर केले़ तर त्यांच्यासह कलाकारांनी विंचू हे भारूड सादर करत विनोदाची पेरणी केली़ यासह गोंधळी, पिंगळा, बैरागी, वाघ्या मुरळी, जोशी, भूत, पोतराज आदि भारुडे सादर करत रंगत वाढवित नेली़ हे करतानाच विनोदासह कडक शब्दात फिरकी घेत त्यांनी प्रबोधन केले़