नाशिकरोडला बस डेपोच्या कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:10 AM2021-01-01T04:10:07+5:302021-01-01T04:10:07+5:30

महापालिकेची स्वतःची बससेवा लवकरच सुरू होत आहे. त्यासाठी नाशिकरोड पूर्व भागात रेल्वे स्थानकात प्रभाग क्रमांक १९ मध्ये दहा ...

Inspection of bus depot work on Nashik Road | नाशिकरोडला बस डेपोच्या कामाची पाहणी

नाशिकरोडला बस डेपोच्या कामाची पाहणी

Next

महापालिकेची स्वतःची बससेवा लवकरच सुरू होत आहे. त्यासाठी नाशिकरोड पूर्व भागात रेल्वे स्थानकात प्रभाग क्रमांक १९ मध्ये दहा एकर जागेत हा बस डेपो सुरू होत आहे. त्यासाठी तीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकालगत नवीन बस डेपोबरोबरच १८ मीटर रस्त्याच्या कामाची पाहणीही यावेळी करण्यात आली. सध्या जमीन समांतरचे काम सुरू असून, लवकरच बांधकामाला प्रारंभ होणार आहे. प्रभागातील सर्व्हे नंबर २४६ ही जागा आहे. बसडेपोसाठी नाशिकरोडला अन्य ठिकाणी वर्षाला एक कोटी भाडे सांगण्यात आले होते. आता महापालिकेला कायमची जागा झाली आहे. बसडेपोचा कुंभमेळ्यातही उपयोग होणार आहे. रेल्वेस्थानक, महामार्ग, १८ मीटर व ३० मीटर रोडलगत ही जागा आहे. साठ मीटरचा रिंग रोड येथून जाणार आहे. बससाठी शिंदे व पळसे भागातील नागरिकांना नाशिकरोडला यावे लागणार नाही. येथून सिन्नरपर्यंत बससेवा देता येईल. नाशिकरोड पूर्वचा विकास होणार आहे. प्रस्तावित बसडेपो शेजारीच तीन एकरमध्ये गार्डन तयार आहे.

यावेळी नितीन खर्जुल, गोरख खर्जुल, शेखर पवार, सागर आवारे, अशोक सांगळे आदी उपस्थित होते.

(फोटो ३१ बस)

Web Title: Inspection of bus depot work on Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.