केंद्रीय निवडणूक निरीक्षकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:55 AM2019-10-17T00:55:58+5:302019-10-17T00:56:32+5:30

विधानसभा निवडणुकीचे केंद्रीय महानिरीक्षक श्रीमती तेनझिंग डोलकर यांनी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तोरणडोंगरी, बाफळून, अलंगुण, कोठुळा, काठीपाडा, उंबरठाण, सूर्यागड, प्रतापगड, भोरमाळ (ल), भोरमाळ (मो) तसेच जिल्हा परिषद शाळा नं. २ या शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली.

Inspection by Central Election Inspector | केंद्रीय निवडणूक निरीक्षकाकडून पाहणी

सुरगाणा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत सुविधांच्या पाहणीदरम्यान विधानसभा निवडणूक निरीक्षक व सिक्कीम राज्याच्या सचिव तेनझिंग डोलकर. समवेत झोनल आॅफिसर संजय मोरे, मुख्याध्यापक रतन चौधरी.

Next

सुरगाणा : विधानसभा निवडणुकीचे केंद्रीय महानिरीक्षक श्रीमती तेनझिंग डोलकर यांनी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तोरणडोंगरी, बाफळून, अलंगुण, कोठुळा, काठीपाडा, उंबरठाण, सूर्यागड, प्रतापगड, भोरमाळ (ल), भोरमाळ (मो) तसेच जिल्हा परिषद शाळा नं. २ या शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली.
या पाहणी दरम्यान तोरणडोंगरी, बाफळून ते म्हैखडक या दरम्यान घाटातील असलेले घनदाट जंगल, लक्षवेधक ठरणारा गोंडाळविहरीचा पाझर तलाव, शेतात काम करणाऱ्या महिला शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्याशी संवाद साधत आदिवासी संस्कृती व इतिहास समजून घेतला. तसेच भेटी दिलेल्या शाळेतील भौतिक सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी तलाठी विजय जाधव, संजय मोरे, तहसीलदार विजय सूर्यवंशी, व्यंकटेश वाडेकर, गोविंद दुर्धवळे, एच. व्ही. शिंदे, चंदर चौधरी, रतन चौधरी आदी सहभागी झाले होते.

Web Title: Inspection by Central Election Inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.