केंद्रीय आरेाग्य पथकाकडून पाहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:16 AM2021-03-10T04:16:27+5:302021-03-10T04:16:27+5:30
नाशिक: नवी दिल्लीतील आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय विशेष पथकाने मंगळवारी नाशिक मधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ...
नाशिक: नवी दिल्लीतील आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय विशेष पथकाने मंगळवारी नाशिक मधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी समितीने जिल्हा रूग्णालयातील प्रयोगशाळा, कोविड कक्षाची पाहाणी करून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्यात कोरेाना रूग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय पथक राज्यातील विविध भागांचा दौरा करीत आहे. त्यानुसार मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील काेरोना परिस्थिती आणि आरेाग्य सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. नाशिकमध्ये आलेल्या पथकामध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे संचालक डॉ.पी.रविंद्रन, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि सल्लागार डॉ. सुनिल खापरडे, आयडीएसपीचे डॉ.संकेत कुलकर्णी यांचा समावेश होता. त्रिसदस्यीय पथकामध्ये राज्य सर्विलन्स अधिकारी देखील सहभागी झाले हेाते. या पथका समवेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुकत कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य उपसंचालक पी.डी.गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्रीनिवास, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.
केंद्राच्या या विशेष पथकाने जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षाची, कोविड प्रयोगशाळेची पाहणी केली. रुग्णांचे व्यवस्थापन, रुग्णांशी संवाद, मनुष्य बळाची माहिती, आरटीपीसीआर लॅबचे व्यवस्थापन या विषयी पथकाने निरिक्षण करुन संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या. आयसोलेशन व क्वारंटाईन नियमांचे कोरोनाबाधित रुग्णाला काटेकोर नियम पालन करण्याच्या सूचना देण्यात येवून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी दिल्यात. पथकाने महापालिकेचे शहरी आरोग्य केंद्र तसेच आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्याला देखील भेट देऊन पाहाणी केली असल्याचे समजते.
कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांची पडताळणी व तपासणी त्वरीत करण्यात यावी, कोरोना रुग्णाचा मृत्यु झाल्यास मृत्युच्या कारणांचे पुर्नविलोकन करण्यात यावे, लग्न समारंभ, राजकिय मेळावे, सामाजिक जमाव या मध्ये कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचनेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही केंद्रीय पथकाने केल्या आहेत.
--इन्फो--
आरेाग्य मंत्रालयाकडून दखल
राज्यातील विविध भागात आरेाग्य विभागाच्या पथकाने पाहाणी करून केारेाना नियंत्रणाबाबत अधिकाऱ्यांना सुचना केलेल्या आहेत. बाजारपेठा लग्न सोहळे तसेच अन्य समारंभांना होणाऱ्या गर्दीवर नियंत्रणात आणण्याची उपाययोजना करण्याच्या स्ुचना यापूर्वीच पथकाने राज्य शासनाला केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने नाशिकमधील पाहाणीला महत्व प्राप्त झाले हेाते. नाशिकमध्ये देखील पथकाने कॉन्टक्ट ट्रेसिंगवर भर देण्याच्या सुचना केल्या आहेत. याबराबेरच सुरक्षिततेच्ाय नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत देखील त्यांनी माहिती घेतली असल्याचे समजते.