तलाठी पदासाठी कागदपत्रांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:01 AM2020-02-18T00:01:47+5:302020-02-18T00:13:51+5:30
नाशिक : बहुचर्चित तलाठी भरतीप्रक्रियेतील आणखी एक टप्पा पुढे सरकला असून, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या कागदपत्र तपासणीला सुरुवात झाली आहे. ...
नाशिक : बहुचर्चित तलाठी भरतीप्रक्रियेतील आणखी एक टप्पा पुढे सरकला असून, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या कागदपत्र तपासणीला सुरुवात झाली आहे. तपासणीच्या पहिल्याच दिवशी सुमारे ८० उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
तलाठी पदाच्या ८३ जागांसाठी सुमारे २२ हजार ८५३ उमेदवारांनी २ ते २६ जुलै २०१९ दरम्यान आॅनलाइन परीक्षा दिली होती. सुमारे २४ दिवस शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा सुरू होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार कक्षेत येणाºया तलाठी परीक्षेच्या निकालानंतर तब्बल दोन महिन्यांनी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. या यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
पडताळणीच्या पहिल्याच दिवशी ८० उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. अर्जासोबत जातीचा दाखला, शैक्षणिक अर्हता, शाळेचा दाखला आणि रहिवासी पुरावा असलेल्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तपसाणीची व्यवस्था करण्यात आली होती. मंगळवारी दुसºया टप्प्यात आणखी ८३ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. ज्यांना पडताळणीसाठी येणे शक्य नव्हते त्यांनी याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला कळविली असून त्यांना एका दिवसाची मुदत देण्यात आल्याचे समजते. तर काहींनी एसएमएस मिळाले नसल्याचीदेखील तक्रार केली. पडताळणीसाठी दोन दिवस अगोदर भ्रमणध्वनीवर संदेश येणे अपेक्षित असताना अनेकांनी वेळेत एसएमएम मिळाले नसल्याची तक्रारही केली. तलाठी पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीनंतर हरकतीसाठी मुदत देण्यात आली होती. यासंदर्भातील कोणतीही हरकत आली नसल्याने यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. उर्वरित उमेदवारांची तपासणी मंगळवारी (दि.१८) होणार आहे. पेसा क्षेत्राबाहेरील ६१ जागांसाठी १८ हजार ९७१ उमेदवारांनी परीक्षा दिली होती तर पेसा क्षेत्रातील २२ जागांसाठी ४१५६ तरुणांनी आॅनलाइन परीक्षा दिली होती.