पालकमंत्र्यांकडून दुष्काळी भागाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:01 AM2018-10-16T00:01:08+5:302018-10-16T00:01:49+5:30
उमराणे : देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील उमराणेसह परिसरात पाण्याअभावी करपलेल्या मका, कांदा आदी खरीप पिकांची नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली.
उमराणे : देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील उमराणेसह परिसरात पाण्याअभावी करपलेल्या मका, कांदा आदी खरीप पिकांची नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली.
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी खरीप हंगाम वाया गेला असून, आगामी काळात जनावरांना चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होणार असल्याने दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी जनतेकडून होत आहे. त्या अनुषंगाने महाजन हे दुष्काळी तालुक्यांच्या पाहणी दौºयावर असून, नाशिकहून येताना सर्वप्रथम देवळा तालुक्यातील चिंचवे (नि.), उमराणे, सांगवी, कुंभार्डे आदी गावांमध्ये दुष्काळसदृश स्थितीची त्यांनी पाहणी केली.
पाहणी दौºयाप्रसंगी आमदार राहुल अहेर, भाजपा जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ, प्रशांत देवरे, पंकज निकम, बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे, विलास देवरे, नंदन देवरे, बाळासाहेब देवरे, दिलीप देवरे, सचिन देवरे, भरत देवरे, बाळा पवार, भगवान देवरे आदींसह शेतकरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासह विविध आशयांचे निवेदन गिरीश महाजन यांना देण्यात आले.