निवडणूक कार्यक्रमाची निरीक्षकांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 06:21 PM2020-12-31T18:21:03+5:302020-12-31T18:21:53+5:30
दिंडोरी : महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत असून २३ डिसेंबर पासून निवडणूक कामकाज सुरू झाले आहेत. दिंडोरी तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या सर्व निवडणुकीचे कामकाज दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये होत असून गुरुवारी (दि.३१) उमेदवार छाननी सुरू असताना तालुक्याचे निवडणूक निरीक्षक, श्रीगोंदा पारनेरचे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी भेट देत कामकाजाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी छाननी प्रक्रिया व आचारसंहिता आढावा घेत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. त्यांच्या समवेत तहसीलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक प्राधिकृत अधिकारी पंकज पवार यांनी संपूर्ण कामकाजाची माहिती दिली.
निवडणूक निरीक्षक यांची पुढील भेट ४ जानेवारी रोजी अर्ज माघार व चिन्ह वाटप या दिवशी असणार आहे.