आयटीआय पूल येथील गणेश घाटाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:04 AM2017-09-04T00:04:22+5:302017-09-04T00:04:52+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही महापालिकेच्या वतीने आयटीआय पूल येथील गणेश घाटावर गणपती विसर्जन व दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात येत असून, शुक्रवारी महापालिकेचे अधिकारी व प्रभागाच्या नगरसेवकांनी पाहणी केली. याठिकाणी आवश्यक असलेली व्यवस्था लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे यावेळी मनपाच्या वतीने सांगण्यात आले.

Inspection of Ganesh Ghat at ITI Pool | आयटीआय पूल येथील गणेश घाटाची पाहणी

आयटीआय पूल येथील गणेश घाटाची पाहणी

Next

सिडको : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही महापालिकेच्या वतीने आयटीआय पूल येथील गणेश घाटावर गणपती विसर्जन व दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात येत असून, शुक्रवारी महापालिकेचे अधिकारी व प्रभागाच्या नगरसेवकांनी पाहणी केली. याठिकाणी आवश्यक असलेली व्यवस्था लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे यावेळी मनपाच्या वतीने सांगण्यात आले.
संपूर्ण सिडको, खुटवडनगर, यमुनानगर, अंबड तसेच सातपूरच्या काही भागांतील नागरिक आयटीआय पूल येथील गणेश घाटावर गणेश विसर्जनासाठी येत असल्याने याठिकाणी दरवर्षी महापालिकेच्या बांधकाम व आरोग्य विभागाच्या वतीने व्यवस्था करण्यात येते. यंदाच्या वर्षी गणरायाचे १२ दिवस असून, ५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार असल्याने आज प्रभागाचे नगरसेवक अलका अहिरे यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी ए. जे. काजी, संजय पाटील यांनी कर्मचाºयांसह पाहणी केली. याठिकाणी गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपतीचे नदी पात्रात विसर्जन न करता दान करणाºयांसाठी गणपती संकलनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच कृत्रिम तलाव, निर्माल्य संकलनाचीदेखील व्यवस्था करण्यात येणार आहे. पाहणी प्रसंग भाजपाचे कैलास अहिरे, निवृत्ती इंगोले, विकी आहिरे, लक्ष्मीकांत मगर, चांगदेव मुंगसे, संजय जाधव, अनिल महाजन, काका कापडणीस आदी उपस्थित होते.

Web Title: Inspection of Ganesh Ghat at ITI Pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.