आरोग्य केंद्राची अधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:18 AM2018-08-03T00:18:07+5:302018-08-03T00:18:42+5:30

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी भेट देऊन कामकाजाची पाहाणी केली.

 Inspection by health center officials | आरोग्य केंद्राची अधिकाऱ्यांकडून पाहणी

आरोग्य केंद्राची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Next

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी भेट देऊन कामकाजाची पाहाणी केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे यांनी आरोग्य योजना, कुटुंब नियोजन, किटकजन्य आजार, कुष्टरोग नियंत्रण, टिबी, प्रसूती, जननी सुरक्षा योजना आदींचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वनिता शिंदे, वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव, माजी सरपंच नामदेव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. आरोग्य केंद्रात रुग्णासाठी जागा कमी पडत असल्याने त्यासाठी चार बेडचा स्वतंत्र वॉर्ड बांधून मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य वनिता शिंदे यांनी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांनी कुटुंब नियोजनाचे पाच रुग्ण दाखल असल्याने त्या रुग्णाना कशा प्रकारे उपचार देण्यात येतात याविषयी माहीती घेतली. यावेळी प्रसूती कक्ष, ओपीडी विभाग, औषध भांडार आदींची पाहाणी केली. कामकाजाबाबत डेकोटे यांनी समाधान व्यक्त केले. ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी भेट दिली. त्यावेळी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र धादवड व सर्व कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते. विशेष म्हणजे सर्वच कर्मचारी मुख्यालयात राहत असल्याने कर्मचारी वर्गाचे जिल्हा आधिकारी डेकाटे यांनी सर्वाचे कौतुक केले. ठाणगाव आरोग्य केंद्रातील कर्मचारी जिल्ह्यासाठी आदर्श राहतील असे सांगितले. यावेळी ठाणगाव आरोग्य केंद्राच्या वतीने नाशिक आरोग्य विभागातील सर्व अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला.

Web Title:  Inspection by health center officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य