मांगीतुंगीत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:14 PM2018-10-16T13:14:44+5:302018-10-16T13:15:04+5:30
ताहाराबाद : श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथे २२ आॅक्टोबर पासून सुरू होणा-या जागतिक अहिंसा शांती महोत्सवाच्या धार्मिक कार्यक्र मासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाच्यावतीने कार्यक्र माच्या पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय अधिका-यांनी मांगीतुंगीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
ताहाराबाद : श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथे २२ आॅक्टोबर पासून सुरू होणा-या जागतिक अहिंसा शांती महोत्सवाच्या धार्मिक कार्यक्र मासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाच्यावतीने कार्यक्र माच्या पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय अधिका-यांनी मांगीतुंगीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. २२ आॅक्टोबर पासून सुरू होणा-या जागतिक अहिंसा शांती महोत्सवाच्या धार्मिक कार्यक्र मासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील पर्यटन मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार दीपिका चव्हाण हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या पाशर््वभूमीवर कार्यक्र मांची ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी सुरू असून, नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक दोरजे, जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन, जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय वनाधिकारी जगदीश येडलावार, कार्यकारी अभियंता एन टी पाटील, महावितरणचे श्रीवास्तव आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्र माच्या पूर्वतयारी संदर्भात सर्व विभागात आढावा यावेळी घेण्यात आला. कार्यक्र मात कुठलेही प्रशासकीय बाबीत कमतरता भासू नये यासाठी अधिकारी वर्गाकडून सूचना देण्यात आल्या. यावेळी मांगीतुंगी निर्माण कमिटी ट्रस्टचे सर्व पदाधिकारीशी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर मान्यवरांचे आगमन व प्रस्थान होईपर्यंत विशेष खबरदारी घेत नियोजन करण्यात आले आहे. मान्यवरांच्या आगमनासाठी पाच ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी सुरू आहे. देवस्थानचे प्रेरणास्रोत चंदनामती माताजी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. राष्ट्रपती प्रथमच मांगीतुंगीला भेट देत असल्याने संपूर्ण परिसराचे या कार्यक्र माकडे लक्ष लागून असल्याने या कार्यक्र माला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्यक्र माची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यक्र म यशस्वीतेसाठी संस्थानचे अध्यक्ष रवींद्र किर्ती स्वामी, मुख्य अधिष्ठाता सी आर पाटील, मंत्री अनिल जैन, विजय जैन, मुकेश जैन,महामंत्री संजय पापडीवाल व मंत्री डॉ. जीवन जैन, भूषण कासलीवाल, प्रदीप ठोळे, सरपंच बाळासाहेब पवार, उपसरपंच उखा कुवर, माजी सरपंच मुरलीधर पवार, रमेश पवार, ग्रामसेवक गावित आदींसह ग्रामस्थ प्रयत्नशिल आहेत.