राज्यस्तरीय समितीकडून करंजगावची पाहणी
By admin | Published: November 4, 2015 11:37 PM2015-11-04T23:37:50+5:302015-11-04T23:38:33+5:30
राज्यस्तरीय समितीकडून करंजगावची पाहणी
निफाड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१२-१३ अंतर्गत निफाड तालुक्यातील करंजगावची औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने पाहणी व मूल्यमापन केले.
करंजगाव बसस्थानकाजवळ ग्रामस्थांनी समितीचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष भास्कर पेरे-पाटील, शासनाचे प्रतिनिधी हेमंत डांगे, सिंधुदुर्ग आश्रमाचे नेवगी, हिंगोली उगम ग्रामीण संस्थेचे सुशांत पाईकराव, प्रवीण पुरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, सोपान खालकर, करंजगावचे सरंपच खंडू बोडके पाटील, उपसरपंच अर्चना कडाळे, सुरेश पाटील, वसंत जाधव, रावसाहेब राजोळे, सुरेश राजोळे, सुरेश गायकवाड आदि उपस्थित होते. डॉ.नरेंद्र पाटील यांनी करंजगावकरांनी राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. सरपंच खंडू बोडके यांनी ग्रामस्वच्छतेतील करंजगावच्या योगदानाविषयी सांगितले. समितीने अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, दलितवस्ती, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मूल्यमापन केले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातर्गत पुरस्कार देण्यात येणार आहे. उत्तर महा२राष्ट्रातून करंजगावची नाशिक विभागात निवड झाली होती. त्याअनुषंगाने ही पाहणी करण्यात आली.(वार्ताहर)