तीन लाखांपेक्षा अधिक प्रवाशांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 10:11 PM2020-05-18T22:11:23+5:302020-05-19T00:34:59+5:30
नाशिक : जिल्ह्यातील हद्दीतून गावाकडे निघालेल्या परप्रांतीय प्रवाशांची ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या चेक नाक्यावर आरोग्य तपासणी केली जात असून, तीन लाखांपेक्षा अधिक प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यातील २७ ठिकाणी उभारण्यात आलेल्या चेक नाक्यांवर वाहने आणि प्रवाशांची तपासणी केली जात आहे.

राज्यात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात परतत असून, जिल्ह्यातील अनेक भागातून मजुरांचे लोंढे रस्त्यावर दिसू लागले आहेत. सुरुवातीला परप्रांतीयांनी पायीच गावाकडची वाट धरली होती. डोक्यावर संसार घेऊन आपल्या बालगोपाळांसह निघालेल्या प्रवाशांनी शेकडो किलोमीटरचा प्रवास केला आहे. तर काहींनी मिळेल त्या वाहनाचा आधार घेत गाव गाठण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर अशाप्रकारच्या वाहनांची तपासणी करण्यात येऊन मजुरांचीदेखील आरोग्य तपासणी करण्यात आली.
सुमारे सव्वलाख वाहने आणि तीन लाखांपेक्षा अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. मजुरांचे लोंढे वाढतच असल्याने शासनाने या परप्रांतीय मजुरांसाठी मध्य प्रदेशात सोडण्यासाठी थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. या प्रवाशांची जागेवरच थर्मल टेस्टिंग केली जात असून, बसेस सॅनिटाईझ केल्या जात आहेत. बसमध्येदेखील केवळ २२ प्रवासी घेतले जात आहेत. दररोज बसेसद्वारे हजारो प्रवाशांना मध्य प्रदेशातील सीमारेषेवर सोडले जात आहे.
-------------------------------------
चेकनाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांवर नजर
थर्मल टेस्ट तसेच अन्य काही लक्षणे आहेत का याबाबतची तपासणी या ठिकाणी करण्यात आली. पायी जाणाºया प्रवाशांनी चेकनाके टाळून प्रवास केला. जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, बागलाण, कळवण, सुरगाणा, येवला, सिन्नर, निफाड, पेठ, इगतपुरी, चांदवड, देवळा, दिंडोरी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी चेकनाके उभारण्यात आले असून, या चेकनाक्यांवरून जाणाºया वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी करण्यात आली.