नांदगाव, मालेगाव आरोग्य केंद्रांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:46 AM2018-09-19T00:46:05+5:302018-09-19T00:46:37+5:30

जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मंगळवारी (दि. १८) नांदगाव व मालेगाव तालुक्यांना भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी केली. या दौऱ्यात त्यांनी माता व बालमृत्यूबाबत आढावा घेतानाच आरोग्य विभागाकडून याबाबत करण्यात येणाºया उपचारांची व उपाययोजनांची माहिती घेतली.

Inspection of Nandgaon, Malegaon Health Centers | नांदगाव, मालेगाव आरोग्य केंद्रांची तपासणी

नांदगाव, मालेगाव आरोग्य केंद्रांची तपासणी

Next

नाशिक : जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मंगळवारी (दि. १८) नांदगाव व मालेगाव तालुक्यांना भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी केली. या दौऱ्यात त्यांनी माता व बालमृत्यूबाबत आढावा घेतानाच आरोग्य विभागाकडून याबाबत करण्यात येणाºया उपचारांची व उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच तीव्र जोखीम असणाºया मातांबाबत खात्री करण्यासाठी संबंधित मातेला बोलावून हिमोग्लोबिन चाचणीही यावेळी घेण्यात आली.
आरोग्य विभागातील कामात उणिवा व त्रुटींसह निर्धारित लक्षापेक्षा कमी काम असलेल्या सर्व संबंधिताना १० आॅक्टोबरपर्यंत कामात सुधारणा करण्याची संधी दिली देण्यात आली आहे. परंतु, त्यानंतरही काम कमी असल्यास जबाबदारी निश्चित करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. मालेगाव व नांदगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणीपुरवठा योजनांचीही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तपासणी करून कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी, मालेगाव तालुक्यातील निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली. न्यायडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. येथील आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया उपकेंद्रांतील कामकाजाचा सोबतच परिसर स्वच्छता, स्वच्छतागृहांची उपलब्धता, पिण्याचे पाणी या बाबींसोबतच माता व बाल मृत्यूबाबतही या दौºयात आढावा घेतला. तसेच मालेगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचीही पाहणी करण्यात आली. यावेळी
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
विजय डेकाटे, तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

Web Title: Inspection of Nandgaon, Malegaon Health Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.