पिंपळगाव उपजिल्हा रु ग्णालयाच्या कामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 09:43 PM2020-09-12T21:43:02+5:302020-09-13T00:04:45+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील उपजिल्हा रु ग्णालयाचा पाहणी दौरा करत उभारणीच्या श्रेयवादाची लढाईच्या मुद्यावर माजी आमदार अनिल कदम यांनी विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्यावर तोफ डागली. त्यात रु ग्णालयाचे काम अपूर्ण असूनही विध्यमान आमदार बनकर यांनी श्रय लाटण्याच्या हौसेपोटी रु ग्णालयाचे औपचारीक उद्धघाटने केल्याचा आरोप करते व त्यांनी आपल्या गावात एक तरी शौचालय बांधले का, असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे आजी-माजी आमदारांमधील रुग्णालयाच्या बांधकामारुन सुरू असलेले शाब्दीक युद्ध तालुकाभर चर्चेचा विषय ठरत आहे.

पिंपळगाव शहरात पूर्णवत्वास येत असलेल्या ग्रामीण रु ग्णालयाची बांधकाम व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांसह माजी आमदार कदम यांनी पाहणी केली. त्यात इमारतीचे बांधकाम पूर्ण व्हावे, स्टापिंग पँटनसाठी प्रियत्न होणे गरजेचे असल्याचे कदम यांनी व्यक्त करत रु ग्णालयाची मंजुरी आपल्याच प्रयत्नाने झाल्याचे कागदोपत्री निर्दनाश आणून दिले. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल थांबवण्याचे आवाहनही कदम यांनी करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार दीपक पाटील, शिवसेना ज्येष्ठ नेते भास्कर बनकर, माजी पं. स. सभापती राजेश पाटील, शिवा सुरासे, शिवसेना तालुका प्रमुख सुधीर कराड, ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष निलेश पाटील, बांधकाम विभाग अभियंता अतुल छापरवाल, तलाठी राकेश बच्छाव, पिंपळगाव शिवसेना शहराध्यक्ष नितीन बनकर, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन मोरे, भाऊ घुमरे, आशिष बागुल आदी उपस्थित होते.