ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची पोलीस निरीक्षक यांचे कडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 06:21 PM2020-12-24T18:21:19+5:302020-12-24T18:21:50+5:30
ब्राह्मणगाव : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली असून १५ जानेवारी मतदान होणार असल्याने येतील मतदान केंद्राच्या इमारतीची सटाणा येथील पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी पाहणी केली.ब्राह्मण गाव , लखमापूर, धांद्री, यशवंत नगर आदी मतदान केंद्राची पाहणी केल्याचे पी.आय.गायकवाड यांनी या प्रसंगी माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मतदान केंद्राची व्यवस्था असून मतदान केंद्राची सुरक्षा व्यवस्था, वीज पुरवठा, पाण्याची व्यवस्था, अपंग व्यक्तींना जाण्यायेण्याच्या सुविधांची यावेळी पाहणी करण्यात आली.
प्रसंगी प्राथमिक शाळेत केंद्र प्रमुख डी.जे. काकलिज यांचे हस्ते पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात पो.नी.गायकवाड यांनी शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना जैवविविधते बद्दल मार्गदर्शन करून वृक्ष लागवड वाढवण्याचे सांगितले.
याप्रसंगी प्रेरणा पुरस्कार प्राप्त शिक्षक संजय भामरे यांनी मनोगत व्यक्त केले.केंद्र प्रमुख डी.जे. काकलिज ,शिक्षक प्रशांत देवर, पोलीस पाटील वैशाली मालपाणी, कैलास मालपाणी, उपस्थित होते.
फोटो:- ब्राह्मण गाव प्राथमिक शाळेत मतदान केंद्राची पाहणी करतांना पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड,केंद्र प्रमुख डी.जे. ककलिज, संजय भामरे, प्रशांत देवरे, कैलास मालपाणी व मान्यवर.