आरटीओकडून रात्री खासगी बसेसची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:14 AM2021-02-07T04:14:12+5:302021-02-07T04:14:12+5:30
प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्यासह २० अधिकाऱ्यांनी ही मोहीम राबविली. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ...
प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्यासह २० अधिकाऱ्यांनी ही मोहीम राबविली. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे केलेल्या कारवाईतून शासनाच्या तिजोरीत महसूल जमा होतो. परंतु, कोरोनामुळे प्रादेशिक परिवहन विभागाचा महसूल घटला होता. मिशन बिगेन नंतर हळूहळू सर्वच जनजीवन पूर्वपदावर येत असून, दळणवळण सुरू झाले आहे. आता प्रादेशिक परिवहन विभागाने महसूल वसुलीकडे लक्ष वेधले असून, नियम न पाळणाऱ्या खासगी बसेस विरोधात अचानक धडक मोहीम राबवून त्याची सुरुवात केली आहे. विनापरवाना वाहन चालविणे, परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालविणे, महाराष्ट्र तसेच परराज्यांतील खासगी प्रवासी वाहने, प्रवासी बसमधून अवैध मालवाहूक करणे, बस योग्यता प्रमाणपत्र नसणे, बसेसची रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायफर, आदींची तपासणी तसेच वाहनांत बेकायदेशीर केलेले बदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, वाहनकर, जादा भाडे आकारणे तपासणी करण्यात आली.
आरटीओने मध्यरात्री नाशिक-धुळे मार्ग, द्वारका, पुणे रोड, सिन्नर, घोटी टोलनाका, येवला, बोरगाव चेक पोस्ट, नाशिक- मुंबई मार्गावर ही तपासणी मोहीम राबविली. यात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५४ बसवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, वासुदेव भगत, हेमंत हेमाडे, योगेश तातू, मोटर वाहन निरीक्षक विलास चौधरी, सचिन पाटील, अनिल धात्रक, समीर शिरोडकर, भीमराज नागरे, संदीप शिंदे, विजय सोळसे, राजेंद्र कराड, उमेश तायडे, सुनील पाटील, सहायक मोटर वाहन निरीक्षक दिनेश पाटील, संदीप तुरकणे सहभागी झाले होते.
(फोटो ०६ आरटीओ)