पेठ तालुक्यातील समस्यांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:35 AM2021-02-05T05:35:49+5:302021-02-05T05:35:49+5:30
पेठ तालुक्यात दरवर्षी जानेवारीनंतर बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. यासाठी जळे, झाडीपाडा परिसरातील बंधाऱ्यातील गाळ काढण्यासंदर्भात त्यांनी ...
पेठ तालुक्यात दरवर्षी जानेवारीनंतर बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. यासाठी जळे, झाडीपाडा परिसरातील बंधाऱ्यातील गाळ काढण्यासंदर्भात त्यांनी भेट देऊन पाहणी केली. शिराळे धरणाजवळ शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र रोहित्र बसवण्याची मागणी करण्यात आली. तसेच शिंगदरी, मानकापूर, तांदळाची बारी परिसरात रस्ते, फरशीपूल कामांची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. यावेळी डॉ. प्रशांत भदाणे, पेठ प्रभारी उमेश काळे, शहराध्यक्ष त्र्यंबक कामडी, तालुका सरचिटणीस रमेश गालट, तालुका उपाध्यक्ष छगन चारोस्कर, प्रमोद शार्दुल, कहांडोळापाडाचे सरपंच कैलास भवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - २५ भारती पवार
पेठ तालुक्यातील झाडीपाडा येथील पाझर तलावाची पाहणी करताना खासदार डॉ. भारती पवार व ग्रामस्थ.
===Photopath===
250121\25nsk_28_25012021_13.jpg
===Caption===
फोटो - २५ भारती पवार पेठ तालुक्यातील झाडीपाडा येथील पाझर तलावाची पाहणी करतांना खासदार डॉ. भारती पवार व ग्रामस्थ.