पुणे येथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी  स्मार्ट सिटी कंपनीकडून प्रकल्पांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:06 AM2017-12-22T01:06:18+5:302017-12-22T01:08:23+5:30

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत पुणे येथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या अधिकाºयांनी अभ्यासदौरा केला.

Inspection of projects from Smart City Company for various information related to ongoing projects in Pune | पुणे येथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी  स्मार्ट सिटी कंपनीकडून प्रकल्पांची पाहणी

पुणे येथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी  स्मार्ट सिटी कंपनीकडून प्रकल्पांची पाहणी

Next
ठळक मुद्दे पुणे स्मार्ट सिटीच्या कामाचे कौतुक नागरिकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आशादायी

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत पुणे येथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या अधिकाºयांनी अभ्यासदौरा केला. प्रकल्पांना भेटी देण्यात येऊन नाशिकमध्येही काही प्रकल्प राबविण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत पुण्यात राबविण्यात येणाºया विविध उपक्र मांचा, विकासकामांची पाहणी करण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, मुख्य नगररचनाकार कांचन बोधले, मुख्य अभियंता मनोहर पोकळे, कंपनी सेक्र ेटरी महेंद्र शिंदे यांनी एकदिवसीय अभ्यास दौरा केला. यावेळी पुणे स्मार्ट सिटीच्या कामाचे कौतुक करून नाशिककरांसाठी अशाच पद्धतीने केंद्र सरकारला अपेक्षित विकासकामे राबविण्याचा विचार असल्याचे थविल यांनी सांगितले. तसेच, सिंहगड रस्त्यावरील कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन डॉ. राजेंद्र जगताप स्मार्ट सिटीअंतर्गत दृष्टीपथात असणाºया प्रकल्पांबद्दल माहिती घेतली. स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत पुण्यातील काम वेग घेत असून, त्याला नागरिकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आशादायी आहे. येथील कामे आणि अधिकाºयांचे अनुभव नाशिकसाठी मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास प्रकाश थविल यांनी व्यक्त केला. संबंधित अधिकाºयांनी औंधमधील पुनर्रचना करण्यात आलेला रस्ता, सायकल लेन, प्लेसमेकिंग, नागरी समस्या निवारण व्यवस्था, लोकांना बसण्यासाठीची खास व्यवस्था या प्रकल्पांना भेटी दिल्या.

Web Title: Inspection of projects from Smart City Company for various information related to ongoing projects in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.