आदिवासी वस्ती ते मोतीनंदर मळा रस्त्याची पहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:22 PM2020-10-06T23:22:35+5:302020-10-07T01:06:08+5:30

खर्डे : येथील मोतीनंदर मळा ते आदिवासी वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावरील कोलथी नदीवर पूल बांधण्यात या मागणीच्या वृत्ताची दखल ...

Inspection of road from tribal settlement to Motinandar Mala | आदिवासी वस्ती ते मोतीनंदर मळा रस्त्याची पहाणी

खर्डे आदिवासी वस्ती जवळील रस्त्याची पहाणी करतांना शाखा अभियंता आर बी चव्हाण ,ग्रामविकास अधिकारी योगेश पगार आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देखर्डे : पंचायत समितीतर्फे दखल, लवकरच काम मार्गी लागणार

खर्डे : येथील मोतीनंदर मळा ते आदिवासी वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावरील कोलथी नदीवर पूल बांधण्यात या मागणीच्या वृत्ताची दखल घेऊन देवळा पंचायत समितीचे शाखा अभियंता आर बी चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली . आदिवासी वस्तीवर जाण्यासाठी पूल बांधण्यात यावा या आशयाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते . दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात खर्डे येथील कोलथी नदी दुथडी वाहत असते. या नदीच्यापलीकडे असलेल्या आदिवासी वस्ती व मोतीनंदर मळा शिवारातील नागरिकांची येण्या जाण्या येण्याची यामुळे मोठी गैरसोय निर्माण होते . ही गैरसोय दूर करण्यासाठी याठिकाणी पूल बांधण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र याकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप खर्डे येथील रमेश देशमाने , भाऊसाहेब मोरे यांनी केला आहे .या संदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शाखा अभियंता आर बी चव्हाण यांनी दखल घेऊन परिस्थिती जाणून घेतली . याकामी तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात येऊन , पाठपुरावा करून पुलाचे काम मार्गी लावण्याचे सांगितले असून, यामुळे येथील आदिवासी वस्ती व मोतीनंदर मळा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी योगेश पगार व ग्रामस्थ उपस्थित होते .

दरवर्षी पावसाळ्यात कोलथी नदीला पूर येतो. यामुळे आदिवासी वस्ती ,मोतीनंदर शिवारातील रहिवाशांचा गावाशी संपर्क तुटतो . तसेच शाळेत जाणाºया येणाºया विद्यार्थ्यांची ही गैरसोय होते . नदीचे पाणी ओसरल्यावर जीव मुठीत धरून नदीच्या पाण्यातून मार्गक्रमण करावा लागतो . पुलाचे काम लवकर मार्र्गी लावावे. -भाऊसाहेब मोरे , रहिवाशी.

 

 

Web Title: Inspection of road from tribal settlement to Motinandar Mala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.