निफाड येथील उद्ध्वस्त द्राक्षबागांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 10:51 PM2021-03-24T22:51:19+5:302021-03-25T00:54:04+5:30
निफाड : परिसरात गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या द्राक्षबागांची पाहणी माजी आमदार अनिल कदम यांनी केली. बाळासाहेब शेळके, धनंजय तांबे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी केली.
निफाड : परिसरात गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या द्राक्षबागांची पाहणी माजी आमदार अनिल कदम यांनी केली. बाळासाहेब शेळके, धनंजय तांबे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी केली.
रमेश जाधव व किरण ढेपले या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गारपिटीने नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी केली. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू असल्याची माहिती मंडळ अधिकारी बाळासाहेब निफाडे यांनी दिली. निफाडसह परिसरातील गावांमध्येही शेतीपिकांचे नुकसान झााल्याने त्यांचेही पंचनामे करावेत, अशी सूचना अनिल कदम यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी बटू पाटील, सोमवंशी, मंडळ अधिकारी निफाडे यांच्यासह निफाडचे माजी नगरसेवक राजाभाऊ शेलार, माजी नगरसेवक अनिल कुंदे, संजय कुंदे, विक्रम रंधवे, नंदू कापसे, विजय धारराव, खंडू बोडके , तानाजी पुरकर, रतन गाजरे, साजन ढोमसे उपस्थित होते.
निफाड येथील बाळासाहेब शेळके यांच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी करताना अनिल कदम. समवेत अनिल कुंदे, संजय कुंदे, नंदू कापसे, खंडू बोडके, विजय धारराव, व पदाधिकारी उपस्थित होते.