अनुसूचित जाती कल्याण विधीमंडळ समितीकडून विंचूरदळवीत पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 05:15 PM2018-09-30T17:15:00+5:302018-09-30T17:16:04+5:30

अनुसूचित जाती कल्याण विधिमंडळ समितीने सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी ग्रामपंचायतीला भेट देवून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची पाहणी केली.

Inspection by the Scheduled Castes Welfare Legislature Committee | अनुसूचित जाती कल्याण विधीमंडळ समितीकडून विंचूरदळवीत पाहणी

अनुसूचित जाती कल्याण विधीमंडळ समितीकडून विंचूरदळवीत पाहणी

Next

अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार हरिश पिंपळे, आमदार मिलींद माने हे जिल्हा दौºयावर पाहणी करण्यासाठी आले होते. समिती सदस्यांसमवेत उपसचिव एन. आर. चिते, पवन म्हात्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोदकुमार पवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, उपअभियंता शिवाजी रौदंळ यांच्यासह विविध खात्यांचे विभागप्रमुख उपस्थित होते. तालुक्यातील विंचूरदळवी व सोनांबे याठिकाणी त्यांनी भेटी देवून मागासवर्गीय घटकांच्या वैयक्तीक व सार्वजनिक लाभांंच्या योजनांच्या झालेल्या अंमलबजावणीची पाहणी केली. विंचूरदळवी येथे समिती सदस्यांनी भेट देवून ग्रामपंचायत स्तरावरून राबविण्यात येणाºया योजनांसह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. ग्रामपंचायतीने स्वनिधीतील १५ टक्के निधीतून मागासवर्गीयांसाठी करावयाच्या खर्चाची माहिती घेण्यात आली. रमाई आवास योजनेतील पूर्ण झालेल्या उत्तम एकनाथ बर्वे, सुनील वसंत बर्वे यांच्या घरकुलाची पाहणी करतानाच या लाभार्थ्यांची योजनेसंदर्भाने संवाद साधण्यात आला. तर याच योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या अंजना देवेंद्र साळवे यांच्या घरकुलाचे भूमिपूजन समितीचे अध्यक्ष नामदार पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले. मागासवर्गीय वस्तीत जावून तेथील नागरिकांशी चर्चा करून तेथे मिळणाºया मुलभूत सुविधांची समितीने माहिती घेतली. दरम्यान ग्रामपंचायतीत दप्तर तपासणी करून मागासवर्गीय घटकांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी, गावात राबविण्यात येणाºया योजनांबाबत समितीने माहिती जाणून घेतली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संगिता पवार यांनी समिती अध्यक्ष व सदस्यांचे स्वागत केले. मागासवर्गीय घटकांसाठी राबविण्यात येणाºया योजना, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, कुपोषण मुक्ती अभियान या संदर्भात ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी आदी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सरपंच संगिता पवार, शांताराम दळवी, जयराम दळवी, भास्कर चंद्रे, जयराम सांगळे, दत्तात्रय शेळके, शांताराम सांगळे, सविता बर्वे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, भाऊसाहेब दळवी, गोरक्ष भोर, पांडुरंग दळवी, भाऊराव पवार, रोशन भिसे, बळवंत बर्वे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Inspection by the Scheduled Castes Welfare Legislature Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.