पोलीस आयुक्तांकडून संवेदनशील मतदार केंंद्रांची पाहणी
By admin | Published: February 18, 2017 01:34 PM2017-02-18T13:34:35+5:302017-02-18T13:34:35+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिके साठी येत्या २१ फे ब्रुवारीला मतदान होणार आहे़
नाशिक : जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिके साठी येत्या २१ फे ब्रुवारीला मतदान होणार आहे़ या कालावधीत उमदेवारांकडून मतदारांवर दबाव तसेच प्रलोभने दाखविण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस आयुक्त डॉ़रवींद्र सिंघल यांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे़ आयुक्तांनी परिमंडळ दोनमधील संवेदनशील मतदान केंद्रांचीही पाहणी केली़ महापालिका क्षेत्रातील मतदारांना प्रलोभन दाखविणाऱ्यांविरोधात नागरिकांनी ९७६२१००१०० या आयुक्तांचा व्हॉट््सअॅप क्रमांक तसेच १०० क्रमांक जाहीर केला आहे. महापालिकेसाठी चार गटांचा एक प्रभाग असून, ३१ प्रभागांत १४०७ मतदान केंद्रे आहेत़ या निवडणुकीत ८२१ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत़ आपणच कसे निवडून येऊ यासाठी उमेदवारांकडून सर्व प्रकारच्या क्लृप्त्या वापरत आहेत़ उमेदवारांकडून मतदारांना पैसे, पार्टी, बक्षिसे, घरगुती साहित्यांचे वाटप अशी आमिषे दाखविली जातात़ या आमिषांना न भुलणाऱ्या मतदारांवर गुंडांकरवी दबाव आणण्याचे प्रकार यापूर्वी शहरात घडले आहेत़ या सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस आयुक्तांनी नागरिकांच्या निर्भिड मतदानासाठी बाहेर पडता यावे यासाठी काळजी घेत आहेत़ नागरिकांवर दबाव येत असल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.