खेडगावी नुकसानग्रस्त द्राक्षबागांची शरद पवार यांच्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 03:33 PM2019-11-01T15:33:15+5:302019-11-01T15:33:31+5:30
खेडगाव : येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. नाशिकहुन -कळवण-सटाणा येथे जात असताना ...
खेडगाव : येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. नाशिकहुन-कळवण-सटाणा येथे जात असताना खेडगाव येथील बाळासाहेब बाबुराव दवंगे यांच्या १०० टक्के नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची पवार यांनी पाहणी करून सदर शेतकऱ्यास आधार दिला. यावेळी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ. दिलीप बनकर, मविप्र संचालक दत्तात्रेय पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक गणपतराव पाटील उपस्थित होते. पवार यांनी दवंगे या शेतकºयाकडून किती द्राक्ष बाग आहे, कधी छाटली, आता शिल्लक किती राहिली, पुढील वर्षासाठी कसे नियोजन करणार ही सर्व माहिती घेतली. उपस्थित सर्व शेतकऱ्यांना नैराश्य येऊ देऊ नका असा सल्ला दिला. पावसामुळे नाशिक जिल्ह्यात जवळ जवळ सगळ्याच भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये सर्वात मोठे नुकसान हे द्राक्ष उत्पादक शेतकरयांचे झाले आहे. द्राक्ष बागांसोबत हाता तोंडाशी आलेले मका, सोयाबीन, बाजरी आणि टोमॅटो या पिकांचे नुकसान झाले. सोंगलेले पीक आज पाण्यात भिजलेले पाहायला मिळत आहे. (०१ खेडगाव १/२)