शिवार योजनेची पाहणी
By admin | Published: January 16, 2017 12:40 AM2017-01-16T00:40:21+5:302017-01-16T00:40:32+5:30
शिवार योजनेची पाहणी
नगरसूल : ‘सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त २०१९’ असे ब्रीद वाक्य असलेली जलयुक्त शिवार योजनेची येथे पाहणी करण्यात आली.
कृषी, पाटबंधारे, लघुसिंचन, लघु पाटबंधारे, वन विभाग, महसूल या सर्व विभागांना जुन्या-नव्या योजनेतील कामे या निवडक वर्षात करून गावे पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी योजनेच्या कामाचा दर्जा चांगला राहावा म्हणून काही कामे करून घेतली. द्विस्तरीय यंत्रणेत कामाचा दर्जा ढासळू नये म्हणून शासनाने त्रिस्तरीय समिती स्थापन
केली . कामाची गुणवत्ता तपासणीसाठी त्रिस्तरीय यंत्रणेमार्फत तपासणी करून त्या कामाचा गोपनीय अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून योग्य व अयोग्य काम करणाऱ्या यंत्रणेतील जबाबदार घटकांवर कारवाई केली जाते. (वार्ताहर)
जलयुक्त शिवार योजनेतील कामाचा दर्जा चांगला राहावा हा यामागील उद्देश आहे. तालुका परिसरात जनविकास दिलासा प्रतिष्ठान औरागाबांदचे निवृत्त अधिकारी जाधव यांनी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे पुर्व विभागातील येवला उपविभागा अंतर्गत येणारे येवला तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील नगरसुल नारंदी नदी वरील सिमेंट प्लग बंधारा यांची पाहणी केली . ग्रामस्थांनी आम्हाला जानेवारी मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असते पण या जलयुक्त शिवार योजनेत दुरु स्त झालेल्या बंधार्यात आजही पाणी असल्याने समाधान वाटले असल्याची प्रतिक्रि या शाखा अभियंता एच.जी.पवार,आर.के.सुर्यवंशी,पी.बी.जगताप यांनी दिली. (वार्ताहर)