पंचायत समितीसाठी जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:28 PM2020-01-25T22:28:06+5:302020-01-26T00:17:56+5:30
पंचायत समिती कार्यालयासाठी जागेचा शोध घेतला जात असून, आमदार हिरामण खोसकर यांनी तहसीलदार कार्यालयाशेजारील पशुवैद्यकीय केंद्राच्या ताब्यात असलेल्या जागेची पाहणी केली.
त्र्यंबकेश्वर : येथे पंचायत समिती कार्यालयासाठी जागेचा शोध घेतला जात असून, आमदार हिरामण खोसकर यांनी तहसीलदार कार्यालयाशेजारील पशुवैद्यकीय केंद्राच्या ताब्यात असलेल्या जागेची पाहणी केली.
तालुका स्थापन होऊन २० वर्षे व त्र्यंबक पंचायत समिती स्थापन होऊन १८ वर्षे वर्षे पूर्ण झाली. तथापि, अजूनही तालुक्याला हक्काचे कार्यालय नाही. पं.स. कार्यालय सुस्थितीत नाही. निवडणूक प्रचारात त्र्यंबक पंचायत समिती कार्यालय त्र्यंबकेश्वरलाच नव्याने बांधले जाईल, या आश्वासनानुसार खोसकर यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिली. यावेळी खोसकर यांनी योग्य पर्याय काढण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी मधुकर लांडे, विनायक माळेकर, दीपक गिते, सुरेश गंगापुत्र, मोतीराम दिवे, मधुकर मुरकुटे, मुख्य अधिकारी प्रवीण निकम, शांताराम बागुल, रवींद्र भोये, नगरसेवक अनिता बागुल, सागर उजे, कल्पना लहांगे, युवराज कोठुळे आदीसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
कालांतराने तेथे यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाले. तथापि हे केंद्र इतरत्र स्थलांतरित झाल्यास जागा परत नगर परिषदेच्या ताब्यात द्यावी लागेल. कारण आजही जागेची मालकी नगर परिषदेकडेच आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अंबोली येथे स्थलांतरित झाले. त्याऐवजी नगर परिषदेची असलेली दवाखान्याची इमारत पाडून त्या ठिकाणी पहिल्यांदा ग्रामीण
रु ग्णालय कार्यान्वित झाले.
पंचायत समिती कार्यालय त्र्यंबकेश्वरलाच असावे, अशी तालुक्याची मागणी आहे. यावेळी मोतीराम दिवे, युवराज कोठुळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुख्य धिकारी निकम यांच्याशी खोसकर यांनी चर्चा केली. दरम्यान, सध्या पंचायत समिती जेथे आहे ती जागादेखील नगर परिषदेच्या आठवडे बाजाराची होती.