अनुदान तत्त्वावर दिलेल्या कृषियंत्राची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:18 AM2021-08-27T04:18:48+5:302021-08-27T04:18:48+5:30
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमाती राखीव निधीअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, भात ...
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमाती राखीव निधीअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, भात लावणी यंत्र, काढणी यंत्र, रोटाव्हेटर आदी यंत्रांचे अनुदान तत्त्वावर वाटप करण्यात आले होते. याप्रसंगी मुंढेगाव येथे शेतकऱ्यांना भेट देत या यंत्रांची पाहणी करण्यात आली.
यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कृषी औजारांविषयी उपस्थित शेतकरी यांना जिल्हा कृषी अधीक्षक सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या घराघरात पोहोचवत जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक सोनवणे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, गोकुळ वाघ, शीतलकुमार तंवर, संजय सूर्यवंशी, भास्कर गिते, अनिल मुजगुडे, रामा दिघे, चंद्रशेखर अकोले, किशोर भरते, संजय पाटील, प्रियांका पांडुळे, जयश्री गांगुर्डे, वंदना शिगाडे, मोहिनी चावरा, तेंद्र मोरे आदींसह शेतकरी व कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
(२६ मुंडेगाव)
मुंढेगाव येथे कृषी विभागाच्या वतीने कृषियंत्राची पाहणी करताना आमदार रमेश पाटील, राजेश पाडवी, अनिल पाटील, शीतलकुमार तंवर, सोनवणे व इतर.
260821\26nsk_28_26082021_13.jpg
मुंढेगाव येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी यंत्राची पाहणी करतांना आमदार रमेश पाटील, राजेश पाडवी, अनिल पाटील, शीतलकुमार तंवर, सोनवणे व इतर.