महाजनकोकडून थर्मल पॉवर प्रोजेक्टची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:13 AM2020-12-06T04:13:49+5:302020-12-06T04:13:49+5:30
रतन इंडियातील थर्मल पॉवर प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आसिम गुप्ता यांच्यासोबत ...
रतन इंडियातील थर्मल पॉवर प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आसिम गुप्ता यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यादरम्यान, हा प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. गुरुवारी (दि. ३) सकाळी साडेदहा वाजता महाजनकोचे उपमुख्य अभियंता गजानन गावंडे यांच्या नेतृत्वाखाली बारा विविध विभागांच्या अभियंत्यांचे पथक दाखल झाले. रतन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अभिव अग्रवाल, व्यवस्थापनाचे अधिकारी अभिमन्यूसिंह राठोड, अमरावती थर्मल पॉवर प्रकल्पाचे अधिकारी हिमांशू माथूर तसेच महाजनकोचे समन्वय अधिकारी आर. सी. दशोरे उपस्थित होते. पथकाने प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली. बॉयलर, निर्मिती संयंत्र, सिव्हिल कामांची अवस्था जाणून घेतली. निर्मिती विभागाची कसून पाहणी केल्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जाणून घेण्यात आला. प्रकल्पाची देखभाल कशा रीतीने होत आहे, कमतरता कोणत्या आणि अधिकची कोणती कामे करावी लागतील याचीही नोंद पथकाने घेतली.
कोळशापासून वीजनिर्मितीवर आधारित प्रकल्पांपैकी गुळवंच येथील प्रकल्प भारतातील सर्वोत्तम असल्याची माहिती प्रकल्प उपसंचालक अभिमन्यूसिंह राठोड, शिशिर मोहपात्रा यांनी पथकाला दिली. प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली असल्याचे उपसंचालक राठोड यांनी सांगितले.
इन्फो
रोजगाराची संधी
आमदार कोकाटे यांनी थर्मल पॉवर प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी हालचाली केल्या. त्यामुळे महाजनकोच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला भेट दिल्यानंतर प्रकल्पग्रस्तांसह उद्योगक्षेत्राच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रकल्प सुरू झाल्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सुमारे दहा ते पंधरा हजार लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, तर व्यावसायिक जागेवर उद्योगांना संधी प्राप्त होणार आहे.
फोटो- ०५ सिन्नर महाजनको
सिन्नर तालुक्यातील मुसळगाव व गुळवंच शिवारातील थर्मल पॉवर प्रकल्पास भेट देऊन पाहणी करताना महाजनकोचे पथक.
===Photopath===
051220\05nsk_14_05122020_13.jpg
===Caption===
सिन्नर तालुक्याच्या मुसळगाव व गुळवंच शिवारात थर्मल पॉवर प्रकल्पास महाजनकोच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली.